खवले मांजर तस्करांना पकडण्यासाठी टाकले जाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 11:33 PM2021-06-18T23:33:29+5:302021-06-18T23:33:56+5:30
pangolin smugglers खवले मांजराच्या तस्करीत माेठी टाेळी सक्रिय असल्याची शक्यता असून या प्रकरणात आणखी आराेपी पकडले जाऊ शकतात. मात्र चाैकशीमध्ये आराेपींकडून दिशाभूल केली जात असल्याची माहिती आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काेराेना संक्रमणाच्या काळात खवले मांजराची माेठ्या प्रमाणात तस्करी झाल्याची सूत्रांची माहिती आहे. सूत्रानुसार बालाघाट व आसपासच्या भागातील तस्करांनी हे वन्यजीव पकडून बाहेरील देशात लाखाे रुपयांना विकले आहे. याबाबतचा सुगावा वाईल्ड लाईफ क्राईम कन्ट्राेल ब्युराे (डब्लूसीसीबी) ला लागला. ज्यामुळे डब्लूसीसीबीने बनावट ग्राहकांच्या माध्यमातून तस्करांशी संपर्क चालविला. या प्रयत्नाला यश आले. तस्करांनी एका खवले मांजराच्या विक्रीचा साैदा निश्चित केला. तस्करांनी बुधवारी सकाळी ४ ते ५ वाजतादरम्यान वर्धा राेडवरील जामठाजवळ खवले मांजर देण्याची तयारी दर्शविली. यानंतर वनविभागाने काही ठराविक अधिकारी व कर्मचाऱ्यांसह १५ लाेकांचे पथक ट्रॅपवर ठेवण्यात आले. पथकामध्येही ही माेहिती गाेपनीय ठेवण्यात आली. सकाळी ५ वाजताच्या दरम्यान एमएच-४९, एटी-९५५६ क्रमांकाच्या ट्रकने मांजराला ठरलेल्या स्थळी घेऊन आराेपी पाेहचले. तयारीत असलेल्या पथकाने चालकासह तीन आराेपींना पकडले. त्यांच्याकडून चाैकशी केल्यानंतर चाैथ्या आराेपीला बालाघाटजवळच्या गावातून आणण्यात आले. सर्व आराेपींना ५ दिवसांच्या वन काेठडीत रिमांडवर ठेवण्यात आले आहे. हे माेठे यश असले तरी खवले मांजराच्या तस्करीत माेठी टाेळी सक्रिय असल्याची शक्यता असून या प्रकरणात आणखी आराेपी पकडले जाऊ शकतात. मात्र चाैकशीमध्ये आराेपींकडून दिशाभूल केली जात असल्याची माहिती आहे.