फवारणी बाधितांच्या कुटुंबीयांना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 01:27 AM2017-10-13T01:27:01+5:302017-10-13T01:27:24+5:30

शेतपिकांवर औषध फवारणी करताना शेतकºयांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे शेतकरी कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. अशाप्रसंगी शासनातर्फे आवश्यक ते संपूर्ण साहाय्य करण्यात येईल,....

Spray help to the family of the victims | फवारणी बाधितांच्या कुटुंबीयांना मदत

फवारणी बाधितांच्या कुटुंबीयांना मदत

Next
ठळक मुद्देचंद्रशेखर बावनकुळे : शेतकºयांच्या घरी जाऊन केले सांत्वन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शेतपिकांवर औषध फवारणी करताना शेतकºयांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे शेतकरी कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. अशाप्रसंगी शासनातर्फे आवश्यक ते संपूर्ण साहाय्य करण्यात येईल, असे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी या दुर्दैवी घटनेत मृत झालेल्या शेतकºयांच्या घरी जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन करताना सांगितले. तसेच त्यांनी मदतीचा विश्वास दिला.
पावडदौना येथील मृत शेतकरी संभाजी मोतीराम वांगे यांच्या निवासस्थानी भेट देऊन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अलकाबाई संभाजी वांगे व मुलगा नीतेश वांगे यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करावा, अशा सूचना दिल्या. या कुटुंबांला घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे शासनातर्फे तसेच वैयक्तिकही कशी मदत करता येईल यादृष्टीनेही प्रयत्न असल्याची ग्वाही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
घरातील कर्त्यापुरुषाचे निधन झाल्यामुळे शेतकरी कुटुंबास अपघात विमा योजनेसह मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी तात्काळ प्रस्ताव पाठवावा अशा सूचना तहसीलदार चंद्रभान खंडाईत यांना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर त्यांचेसमवेत उपस्थित होत्या.

ढोलवार कुटुंबीयांना ५० हजाराची वैयक्तिक मदत
यानंतर पालकमंत्री यांनी मौदा तालुक्यातील शेतपिकांवर औषध फवारणीमुळे मृत झालेल्या खात येथील नीतेश देवराव ढोलवार यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. तसेच मृत शेतकरी नीतेश यांची आई वेणूबाई देवराव ढोलवार, वडील देवराव ढोलवार व भाऊ मुकेश देवराव ढोलवार यांचे सांत्वन करताना आपण स्वत: ५० हजार व मुख्यमंत्री निधीतून दोन लाख रुपयांची मदत करणार असल्याचे सांगितले.
फवारणीसंदर्भात मार्गदर्शन करा
शेतपिकांवर फवारणी करताना दुर्दैवी घटना घडू नये यासाठी तालुका कृषी अधिकाºयांनी प्रत्येक शेतकºयाच्या शेतावर जाऊन फवारणी संदर्भात मार्गदर्शन करावे, अशा सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्यात.
 

Web Title: Spray help to the family of the victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.