एसपीयूच्या जवानाने स्वतःला घातली गोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:06 AM2021-07-04T04:06:36+5:302021-07-04T04:06:36+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाची लागण आणि नंतर झालेल्या दुष्परिणामामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या विशेष सुरक्षा पथकातील (एसपीयू) एका जवानाने ...

The SPU jawan shot himself | एसपीयूच्या जवानाने स्वतःला घातली गोळी

एसपीयूच्या जवानाने स्वतःला घातली गोळी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाची लागण आणि नंतर झालेल्या दुष्परिणामामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या विशेष सुरक्षा पथकातील (एसपीयू) एका जवानाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. प्रमोद शंकरराव मेरगुवार (४६) असे त्यांचे नाव आहे. शनिवारी दुपारी १२.३० च्या सुमारास ही घटना घडली. ती उघड झाल्यानंतर पोलीस दलात एकच खळबळ उडाली.

ग्रामीण पोलीस दलात नियुक्तीला असलेले प्रमोद गेल्या पाच वर्षांपासून विशेष सुरक्षा पथकात कार्यरत होते. ते मानकापुरात पांडुरंग सभागृहाजवळ राहत होते.

तीन महिन्यापूर्वी त्यांना कोरोना झाला. त्यातून बरे झाल्यानंतर त्यांचे म्युकरमायकोसिसचे ऑपरेशन झाले. त्यानंतर डोळे आणि डोकेदुखीचा त्यांना त्रास होऊ लागला. एका डोळ्याची नजरही कमजोर झाली. कुटुंबीयांनी त्यांच्यावर नागपूरसह हैदराबाद येथेही उपचार केले. एक आठवडा उपचार केल्यानंतर ते नागपुरात परत आले. मात्र, त्यांना पाहिजे तसा लाभ झाला नाही. त्यामुळे त्यांची मानसिक स्थिती बिघडली. मनोबल खचल्यामुळे ते गेल्या काही दिवसापासून कमालीचे अस्वस्थ होते.

शनिवारी सकाळी जेवण केल्यानंतर ते आपल्या वरच्या माळ्यावरील खोलीत गेले. यावेळी कुटुंबीय खालीच होते. दुपारी १२.३० ते १ च्या सुमारास घरच्यांना किंकाळी फोडल्यासारखा आवाज आला. त्यामुळे घरची मंडळी वरच्या माळ्यावर गेली. दार आतून लावून असल्याने घरच्यांनी खिडकीतून बघितल्यावर प्रमोद रक्ताच्या थारोळ्यात पडून दिसले.

---

दार तोडून काढले बाहेर

प्रमोद यांनी सर्व्हिस रिव्हॉल्वर तोंडात घेऊन गोळी झाडली. ती मानेतून आरपार निघाली. घरच्यांनी दार तोडून प्रमोद यांना बाहेर काढले आणि मानकापुरातील एका खासगी इस्पितळात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

---

पोलीस दलात खळबळ

या घटनेची माहिती मानकापूर पोलिसांना कळविण्यात आली. त्यानंतर एसपीयूच्या जवानाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे वृत्त वायुवेगाने शहरात पसरले. त्यामुळे पोलीस दलात एकच खळबळ निर्माण झाली. मोठ्या प्रमाणात पोलीस अधिकारी कर्मचारी इस्पितळ आणि त्यांच्या निवासस्थानी पोहचले. ठाणेदार वैजयंती मांडवधरे, पोलीस उपायुक्त विनीता साहू यांनीही घटनास्थळी पोहचून कारण जाणून घेतले.

----

Web Title: The SPU jawan shot himself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.