नागपुरात मोकाट श्वानांना पकडण्यासाठी पथकाची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 09:05 PM2019-02-23T21:05:42+5:302019-02-23T21:07:28+5:30

शहरातील मोकाट श्वानांच्या संख्ेयला आळा घालण्यासाठी महापालिके ने श्वानांवर नसबंदी करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. गेल्या नऊ दिवसात १३८ श्वानांवर नसबंदी करण्यात आली. यात प्रामुख्याने रेल्वे स्टेशन परिसरातील मोकाट श्वानांचा समावेश आहे. आपल्याला कुणीतरी पकडायला येत असल्याची जाणीव श्वानांना होते. त्यामुळे पथक दिसले की, ते श्वान धूम ठोकतात. नसबंदीसाठी मोकाट श्वानांना पकडण्यासाठी पथकाला चांगलीच कसरत करावी लागत आहे.

Squad exercise for catching stray dogs in Nagpur | नागपुरात मोकाट श्वानांना पकडण्यासाठी पथकाची कसरत

नागपुरात मोकाट श्वानांना पकडण्यासाठी पथकाची कसरत

Next
ठळक मुद्देनऊ दिवसात १३८ श्वानांवर नसबंदी : रेल्वे स्टेशन परिसरातील श्वानांवर नसबंदी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील मोकाट श्वानांच्या संख्येला आळा घालण्यासाठी महापालिके ने श्वानांवर नसबंदी करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. गेल्या नऊ दिवसात १३८ श्वानांवर नसबंदी करण्यात आली. यात प्रामुख्याने रेल्वे स्टेशन परिसरातील मोकाट श्वानांचा समावेश आहे. आपल्याला कुणीतरी पकडायला येत असल्याची जाणीव श्वानांना होते. त्यामुळे पथक दिसले की, ते श्वान धूम ठोकतात. नसबंदीसाठी मोकाट श्वानांना पकडण्यासाठी पथकाला चांगलीच कसरत करावी लागत आहे.
१४ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. मोकाट श्वानांना पकडून त्यांचे लसीकरण व नसबंदी करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात रेल्वेस्थानक परिसरातील श्वानांवर नसबंदी करण्यात आली. यानंतर विमानतळ, मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील मोकाट श्वानांवर नसबंदी केली जाणार आहे. सातारा येथील वेट फॉर अ‍ॅनिमल या गैरसरकारी संस्थ्ंोला हे काम देण्यात आले आहे. याकामी दहा कर्मचारी व दोन डॉक्टर आहेत.
कर्मचाऱ्यांच्या हातात जाळ्या दिसल्या की श्वान वाट्टेल त्या मार्गाने पळताना दिसतात. ‘वेट फॉर अ‍ॅनिमल’ ही संस्था केंद्रीय पर्यावरण व वने मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय जीवजंतू कल्याण बोर्डाशी संलग्नित आहे. महाराजबागसमोरील रुग्णालयात प्रति दिवस ४० मोकाट श्वानांवर नसबंदी शस्त्रक्रिया व अ‍ॅन्टीरॅबीज लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. ही संस्था प्रारंभी २० ते २५ मोकाट श्वानांवर नसबंदी शस्त्रक्रिया व अ‍ॅन्टीरॅबीज लसीकरण करणार आहे. यासाठी संस्थेला प्रति श्वान ७०० रुपये दिले जात आहेत. नसबंदी केल्यानंतर व लसीकरण झाल्यानंतर मोकाट श्वानांना महाराष्ट्र पशुविज्ञान व मत्स्य विद्यापीठाच्या रुग्णालयात तीन दिवस ठेवण्यात ठेवले जाते. त्यानंतर त्यांना त्यांच्या मूळ जागी आणून सोडले जात असल्याची माहिती महापालिकेचे पशुचिकित्सा अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांनी दिली.
शहरात सध्या ९० हजारांवर मोकाट श्वान असल्याचा अंदाज आहे. ऑगस्ट २००६ मध्ये पहिल्यांदा चार संस्थांना नसबंदी शस्त्रक्रिया व अ‍ॅन्टीरॅबीज लसीकरण राबविण्यात आले होते. २०१० पर्यंत हा कार्यक्रम चालला. त्यानंतर २०११ व २०१७ मध्येही ही मोहीम राबविण्यात आली होती. २०१४ पासून गेल्या वर्षी २०१९ पर्यंत एकूण १० हजार ५४६ मोकाट श्वानांवर नसबंदी करण्यात आली. त्यावर ५५ लाख ७९ हजार ५९३ रुपयांचा खर्च करण्यात आला. २०१६-१७ मध्ये हे अभियान राबविण्यात आले आहे. २०१८ मध्ये स्थायी समितीने या प्रस्तावास मंजुरी प्रदान केली होती. जनसंवाद कार्यक्रमात नागरिकांनी मोकाट श्वानांच्या तक्र्रारी केल्या होत्या. त्यानंतर प्रशासनाने तातडीने हा कार्यक्रम सुरू केला.
सोनेगाव केंद्र लवकरच सुरू होणार
महापालिकेच्या प्रत्येक झोनमध्ये मोकाट श्वानांवर नसबंदी केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. यातील एक केंद्र सुरू झाले आहे. सोनेगाव परिसरात पुन्हा एक केंद्र उभारण्यात आलेले आहे. ते लवकरच सुरू होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

 

Web Title: Squad exercise for catching stray dogs in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.