श्रीकांत कुकवासला सात वर्षे कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:09 AM2021-02-10T04:09:28+5:302021-02-10T04:09:28+5:30
नागपूर : विशेष सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करणारा आरोपी श्रीकांत प्रेमलाल कुकवास (३१) याला ७ वर्षे ...
नागपूर : विशेष सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करणारा आरोपी श्रीकांत प्रेमलाल कुकवास (३१) याला ७ वर्षे कारावास व १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ३ महिने अतिरिक्त कारावास अशी कमाल शिक्षा सुनावली. न्या. आर. आर. पटारे यांनी मंगळवारी हा निर्णय दिला.
ही घटना वाठोडा पोलिसांच्या हद्दीत घडली. त्यावेळी पीडित मुलगा १२ वर्षे वयाचा होता. १७ नोव्हेंबर २०१९ रोजी दुपारी १२च्या सुमारास मुलगा परिसरात खेळत असताना आरोपीने त्याला घरात बोलावून संबंधित गुन्हा केला. पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आल्यानंतर १८ नोव्हेंबर रोजी आरोपीला अटक करण्यात आली होती. पोलीस उपनिरीक्षक एस. टी. अंबुरे यांनी प्रकरणाचा तपास केला. न्यायालयात सरकारच्या वतीने ॲड. अजय जिकार यांनी कामकाज पाहिले.