धक्कादायक! स्वत:वर गोळी झाडून SRPF च्या निरिक्षकाची आत्महत्या
By दयानंद पाईकराव | Published: April 6, 2024 09:49 PM2024-04-06T21:49:22+5:302024-04-06T21:50:09+5:30
यात एसएलआरमधील गोळी त्याच्या डोक्यातून आरपार निघून त्याचा जागीच मृत्यू झाला.
नागपूर : एसएलआरने फायर करून एसआरपीएफ ग्रुप नं. ४ च्या ड्रील इन्स्पॅक्टरने आत्महत्या केल्याची घटना वाडी पोलिस ठाण्यांतर्गत शनिवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास सुराबर्डी येथील अपारंपारीक प्रशिक्षण केंद्रात (युओटीसी) घडली.
मंगेश मस्की (३५, रा. युओटीसी क्वार्टर, सुराबर्डी) असे आत्महत्या केलेल्या एसआरपीएफ जवानाचे नाव आहे. तो सुराबर्डी येथील युओटीसी केंद्रात ड्रील इन्स्पॅक्टर म्हणून कार्यरत होता. त्याच्या कुटुंबात पत्नी आणि दोन मुले असून त्याची पत्नीही वाडी पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. शनिवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास मंगेश मस्की याने आपल्याजवळ असलेली एसएलआर मानेखाली ठेऊन एक राऊंड फायर केला.
यात एसएलआरमधील गोळी त्याच्या डोक्यातून आरपार निघून त्याचा जागीच मृत्यू झाला. फायरींगचा आवाज ऐकल्यानंतर त्याचे सहकारी धाऊन गेले असता तो रक्ताच्या थारोळ्यात पडून दिसला. या घटनेची माहिती तातडीने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना देण्यात आली. वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि वाडी पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. आत्महत्या केलेला जवान मंगेश मस्की यास दारुचे व्यसन असल्याची माहिती असून त्याने आत्महत्या का केली ? याचे नेमके कारण कळु शकले नाही. तपास वाडी पोलिस करीत आहेत.