‘एसआरपीएफ’ पाेलिस शिपायाची क्वार्टरमध्ये आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2023 10:01 PM2023-04-04T22:01:01+5:302023-04-04T22:01:27+5:30

Nagpur News राज्य राखीव पाेलिस दलातील (एसआरपीएफ) शिपायाने क्वार्टरमध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना हिंगणा परिसरातील एसआरपीएफ कॅम्प येथे साेमवारी (दि. ३) सायंकाळी घडली.

'SRPF' police constable commits suicide in quarters | ‘एसआरपीएफ’ पाेलिस शिपायाची क्वार्टरमध्ये आत्महत्या

‘एसआरपीएफ’ पाेलिस शिपायाची क्वार्टरमध्ये आत्महत्या

googlenewsNext

हिंगणा : राज्य राखीव पाेलिस दलातील (एसआरपीएफ) शिपायाने क्वार्टरमध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना हिंगणा परिसरातील एसआरपीएफ कॅम्प येथे साेमवारी (दि. ३) सायंकाळी घडली. मानसिक आजार असल्याने त्यांच्यावर औषधाेपचार सुरू हाेता, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

प्रशांत रामेश्वर कंगाले (२७, रा. एसआरपीएफ क्वार्टर, हिंगणा रोड, नागपूर) (बक्कल क्रमांक-८३५) असे मृताचे नाव आहे. तो राज्य राखीव पोलिस दल (गट-४)मध्ये शिपाई पदावर कार्यरत होता. काही महिन्यांपासून तो मानसिक आजाराने त्रस्त हाेता. त्याच्यावर औषधाेपचार सुरू असल्याने अधिकाऱ्यांनी त्याला स्थानिक कंपनीत ठेवले होते. ताे परिसरातील मंदिराची देखभाल करायचा. सोमवारी सायंकाळी ५:३० वाजता तो ड्युटीवर गेला नव्हता. शिवाय, ताे फोनदेखील रिसिव्ह करीत नव्हता. त्यामुळे सहायक फौजदार विजय नेवारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी क्वार्टरमध्ये जाऊन बघितले असता त्यांना प्रशांत मृतावस्थेत पडून असल्याचे आढळून आले. त्याने गळफास लावला हाेता. शिवाय, गळफासाची दाेरी तुटली हाेती. विजय नेवारे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पाेलिसांना सूचना दिली. पाेलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. या प्रकरणी एमआयडीसी पाेलिसांनी एसआरपीएफ गट-४चे उपनिरीक्षक सुनील कळस्कर यांच्या तक्रारीवरून अकस्मात मृत्यूची नाेंद करून तपास सुरू केला आहे.

सुसाइड नाेट

प्रशांतने आत्महत्या करण्यापूर्वी खाेलीत ‘सुसाइड नाेट’ लिहून ठेवली हाेती. ती एसआरपीएफ अधिकाऱ्यांसह पाेलिसांच्या हाती लागली. ‘आपली मानसिक स्थिती ठीक नसल्याने आपण आत्महत्या करीत आहोत,’ असे त्या सुसाइड नाेटमध्ये नमूद असल्याची माहिती पाेलिस अधिकाऱ्यांनी दिली.

Web Title: 'SRPF' police constable commits suicide in quarters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Deathमृत्यू