SSC, HSC Result : दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार

By आनंद डेकाटे | Published: September 1, 2022 04:32 PM2022-09-01T16:32:31+5:302022-09-01T16:33:49+5:30

निकाल www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल.

SSC, HSC Result : The result of 10th-12th supplementary examination will be announced tomorrow | SSC, HSC Result : दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार

SSC, HSC Result : दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार

Next

नागपूर : राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल २ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीची पुरवणी परीक्षा २१ जुलै ते २४ ऑगस्ट दरम्यान तर दहावीची पुरवणी २७ जुलै ते १२ ऑगस्ट दरम्यान घेण्यात आली होती. २ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन निकाल www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल.

या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुण उपलब्ध होतील. ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर तलेगचच दुसऱ्या दिवसापासून व्हेरिफइकेशनसाठी सुद्धा अर्ज करता येईल. हा अर्ज सुद्धा ऑनलाईनच करावयाचा आहे. गुणपडताळणीसाठी ३ सप्टेंबर ते १२ सप्टेंबरपर्यंत व छायाप्रतीसाठी २२ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येईल.

Web Title: SSC, HSC Result : The result of 10th-12th supplementary examination will be announced tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.