दहावीचा निकाल; नागपूर बोर्डाचा निकाल ९९.८४ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 02:54 PM2021-07-16T14:54:08+5:302021-07-16T14:54:48+5:30

Nagpur News राज्य शिक्षण मंडळाने शुक्रवारी दहावीचा निकाल घोषित केला. यात नागपूर विभागीय शिक्षण मंडळाचा निकाल ९९.८४ टक्के लागला.

SSC result; Nagpur Board's result is 99.84 percent | दहावीचा निकाल; नागपूर बोर्डाचा निकाल ९९.८४ टक्के

दहावीचा निकाल; नागपूर बोर्डाचा निकाल ९९.८४ टक्के

googlenewsNext
ठळक मुद्दे४८३७५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत झाले उत्तीर्ण 

 लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : राज्य शिक्षण मंडळाने शुक्रवारी दहावीचा निकाल घोषित केला. यात नागपूर विभागीय शिक्षण मंडळाचा निकाल ९९.८४ टक्के लागला. यंदा परीक्षा झाली नसली तरी नववी व दहावीच्या गुणदानातून झालेल्या मुल्यांकनानुसार ४८३७५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. 
    नागपूर बोर्डात १,५५,५०६ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. यातील १,५५,५०५ विद्यार्थ्यांचे मुल्यांकन बोर्डाला प्राप्त झाले होते. यातील १,५२,२६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची सरासरी ९९.८४ टक्के आहे.  विशेष म्हणजे नागपूर विभागात सर्वाधिक ९९.९५ टक्के निकाल वर्धा जिल्ह्याचा लागला आहे.  उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये मुलींची टक्केवारी ९९.८८ असून मुलांची टक्केवारी ९९.८० आहे. 


- नागपूर मंडळातील जिल्हानिहाय लागलेला निकाल 


वर्धा - ९९.९५
भंडारा - ९९.८४
चंद्रपूर - ९९.६४
नागपूर - ९९.८६
गडचिरोली - ९९.८९
गोंदियता - ९९.९२

Web Title: SSC result; Nagpur Board's result is 99.84 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.