बस चढली दुभाजकावर! ४५ प्रवासी बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 11:16 PM2018-02-09T23:16:08+5:302018-02-09T23:19:00+5:30

एसटी महामंडळाच्या बसला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ट्रकने मागील बाजूने धडक दिली. त्यामुळे भरधाव बस अनियंत्रित होऊन थेट रस्ता दुभाजकावरच चढली. मात्र सुदैवाने दुर्घटना झाली नाही. हा प्रकार शुक्रवारी (दि. ९) सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास बाजारगावनजीकच्या पांजरा फाटा येथे घडला. या बसमध्ये तब्बल ४५ प्रवासी होते.

S.T. Bus jumped on road divider ! 45 passengers escaped | बस चढली दुभाजकावर! ४५ प्रवासी बचावले

बस चढली दुभाजकावर! ४५ प्रवासी बचावले

googlenewsNext
ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यातील पांजरा फाटा येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एसटी महामंडळाच्या बसला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ट्रकने मागील बाजूने धडक दिली. त्यामुळे भरधाव बस अनियंत्रित होऊन थेट रस्ता दुभाजकावरच चढली. मात्र सुदैवाने दुर्घटना झाली नाही. हा प्रकार शुक्रवारी (दि. ९) सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास बाजारगावनजीकच्या पांजरा फाटा येथे घडला. या बसमध्ये तब्बल ४५ प्रवासी होते. त्यातील काही किरकोळ जखमी झाले.
नागपूर येथून एमएच-४०/एन-९३१६ क्रमांकाची आर्वी आगाराची नागपूर - आर्वी ही बस ४५ प्रवाशांना घेऊन कोंढाळीकडे जात होती. बसमध्ये बहुसंख्य विद्यार्थी होते. ही बस पांजरा फाट्याजवळ येताच मागाहून आलेल्या भरधाव ट्रकने ओव्हरटेकच्या प्रयत्नात बसला धडक दिली. त्यामुळे क्षणार्धात झालेल्या या प्रकाराने बसचालक गणेश हरिभाऊ गुल्हाणे रा. आर्वी याचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्ता दुभाजकावर चढली. मात्र त्यानंतर बसचालकाने प्रसंगावधान राखून बस थांबविण्याचा आटोक्यात प्रयत्न केला आणि त्यात त्याला यश आले.
बस दुभाजकावर चढताच बसला जबर धक्का बसला. त्यामुळे बसमधील काही प्रवासी हे समोरील सीटवर आदळले. त्यात काही प्रवासी हे किरकोळ जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच बाजारगाव येथील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. किरकोळ जखमींना लगेच कोंढाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथे प्रथमोपचार करून त्यांना सुटी देण्यात आली.

Web Title: S.T. Bus jumped on road divider ! 45 passengers escaped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.