एसटी महामंडळ : ‘त्या’ ८३ कर्मचाऱ्यांना काम बंद करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 09:03 PM2020-07-18T21:03:01+5:302020-07-18T21:04:44+5:30

एसटी महामंडळाच्या नागपूर विभागात २०१९-२० मध्ये कामावर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांची नेमणूक तात्पुरती स्थगित करण्याचा आदेश शुक्रवारी मुंबई मुख्यालयाने पाठविला होता. त्यानुसार नागपूर विभागातील ८३ चालक कम वाहकांना काम बंद करण्याबाबतचे आदेश शनिवारी देण्यात आले.

ST Corporation: Order to stop work of 'those' 83 employees | एसटी महामंडळ : ‘त्या’ ८३ कर्मचाऱ्यांना काम बंद करण्याचे आदेश

एसटी महामंडळ : ‘त्या’ ८३ कर्मचाऱ्यांना काम बंद करण्याचे आदेश

googlenewsNext
ठळक मुद्दे‘लॉकडाऊन’चा २३० कर्मचाऱ्यांना फटका

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : एसटी महामंडळाच्या नागपूर विभागात २०१९-२० मध्ये कामावर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांची नेमणूक तात्पुरती स्थगित करण्याचा आदेश शुक्रवारी मुंबई मुख्यालयाने पाठविला होता. त्यानुसार नागपूर विभागातील ८३ चालक कम वाहकांना काम बंद करण्याबाबतचे आदेश शनिवारी देण्यात आले.
नागपूर विभागात या आदेशाचा २३० कर्मचाऱ्यांना फटका बसला आहे. यात ८३ कर्मचाऱ्यांची नेमणूकही करण्यात आली होती. याशिवाय अनुकंपा तत्त्वांतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षणही थांबविण्यात आले आहे. एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती चांगली होईपर्यंत या कर्मचाऱ्यांना काम बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एसटी महामंडळाच्या नागपूर विभागांतर्गत ५८० बसेस चालविण्यात येतात. कोरोनाचे संकट येण्यापुर्वी बसेसच्या तुलनेत कर्मचाऱ्यांचा तुटवडा भासत होता. त्यावेळी विभागात चालक कम वाहक पदाची भरती करण्यात आली. यात नागपूर विभागात २३० नवे कर्मचारी नियुक्त केले जाणार होते. हे कर्मचारी वाहक आणि चालक दोन्ही कामे करणार होते. ८३ जणांना नागपूर विभागात नेमणूक देण्यात आली होती तर इतर कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सुरु होते. त्यांना सहा महिन्यात नेमणूक देण्यात येणार होती. परंतु मार्च महिन्यापासून कोरोनाचे संकट वाढल्यामुळे एसटी बसेस ठप्प झाल्या. कोरोनामुळे एसटी बसेस कधी सुरू होतील, याची शाश्वती नाही. या परिस्थितीत नव्या कर्मचाऱ्यांना कसे वेतन द्यावे, असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे. त्यामुळे एसटी बसेसची वाहतुक सुरळीत होईपर्यंत या कर्मचाऱ्यांची नेमणूक स्थगित करण्याचा निर्णय मुख्यालयाने घेतला आहे.

काम बंद करणे अन्यायकारक
‘कोणत्याही खासगी कंपनीतून कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात येऊ नये असे महाराष्ट्र शासनाचे आदेश आहेत. परंतु एसटी महामंडळाने नेमणूक केलेल्या कर्मचाऱ्यांना काम बंद करण्याचे आदेश देणे चुकीचे आहे. महामंडळाने हा निर्णय मागे घेऊन कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा’
अजय हट्टेवार, प्रादेशिक सचिव, एस. टी. कामगार संघटना

Web Title: ST Corporation: Order to stop work of 'those' 83 employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.