एसटीचा प्रवास सुरक्षित, मग ट्रॅव्हल्सला पसंती का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:06 AM2021-07-23T04:06:43+5:302021-07-23T04:06:43+5:30

जिल्ह्यात झालेले एसटीचे अपघात किरकोळ गंभीर प्राणांतिक २०१७ २० ३८ १७ २०१८ २५ ४९ १७ २०१९ ...

ST travel is safe, so why travels? | एसटीचा प्रवास सुरक्षित, मग ट्रॅव्हल्सला पसंती का ?

एसटीचा प्रवास सुरक्षित, मग ट्रॅव्हल्सला पसंती का ?

Next

जिल्ह्यात झालेले एसटीचे अपघात

किरकोळगंभीरप्राणांतिक

२०१७ २० ३८ १७

२०१८ २५ ४९ १७

२०१९ २४ ४५ ६

२०२० १६ ८१

२०२१ (जुलैपर्यंत)९ १२ ४

एसटीला स्पीड लॉक, ट्रॅव्हल्स सुसाट

-एसटी महामंडळाच्या बसेसचा स्पीड लॉक केलेला असतो. ग्रामीण भागात धावणाऱ्या बसेसचा स्पीड ६५ किलोमीटर प्रतीतास, लांब व मध्यम पल्ल्याच्या ७० वर आणि शिवशाही ७५ ते ८० पर्यंत स्पीड लॉक करण्यात येतो. त्या तुलनेत ट्रॅव्हल्सचा स्पीड थोडा अधिक असतो. ट्रॅव्हल्सचा स्पीड ८० वर लॉक केलेला असतो. त्यामुळे एसटी बसच्या तुलनेत ट्रॅव्हल्स सुसाट वेगाने धावताना दिसतात.

ट्रॅव्हल्सने होतो आरामदायी प्रवास

‘ट्रॅव्हल्सने आरामदायी प्रवास होत असल्यामुळे मी ट्रॅव्हल्सच्या प्रवासाला पसंती देतो. याशिवाय अपघात झाल्यास एसटीच्या तुलनेत ट्रॅव्हल्सकडून अधिक भरपाई मिळते.’

- विनोद नाईक, प्रवासी

ट्रॅव्हल्समध्येही होतो सुरक्षित प्रवास

‘मी सुरुवातीपासून ट्रॅव्हल्सने प्रवास करतो. परंतु आजपर्यंत कधीच अपघात झाल्याचा अनुभव आला नाही. ट्रॅव्हल्सनेही सुरक्षित प्रवास होत असल्यामुळे मी ट्रॅव्हल्सच्या प्रवासाला प्राधान्य देतो.’

-वसंत जाधव, प्रवासी

ट्रॅव्हल्समध्ये घेतली जाते स्त्रियांची काळजी

‘ट्रॅव्हल्सचा प्रवास आरामदायी असतो. अपघात झाल्यास इन्शुरन्सचे पैसे मिळतात. एखादी महिला एकट्याने प्रवास करीत असेल तर तिच्या बाजूला पुरुष प्रवाशाला सीट देण्यात येत नाही. तसेच १० ते १२ वर्षांला ट्रॅव्हल्स गाडी बदलण्यात येत असल्यामुळे अपघाताची शक्यता राहत नाही.’

- महेंद्र लुले, उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ट्रक, टेम्पो, टॅंकर, बस वाहतूक महासंघ

एसटी सुरक्षित प्रवासाला प्राधान्य देते

‘एसटीच्या प्रवासात प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी घेण्यात येते. परंतु ट्रॅव्हल्स बसेस लक्झरीयस असल्यामुळे त्या आरामदायी असतात. त्यात प्रवाशांच्या मनोरंजनाची व्यवस्था असते. खासगी ट्रॅव्हल्स प्रवासभाड्यात तडजोड करून एसटीसोबत स्पर्धा करीत असल्यामुळे प्रवासी ट्रॅव्हल्सकडे वळतात.’

-निलेश बेलसरे, विभाग नियंत्रक, नागपूर विभाग

...........

Web Title: ST travel is safe, so why travels?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.