नागपुरातील पाचपावलीत तलवारींचा साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 01:14 AM2019-04-10T01:14:19+5:302019-04-10T01:15:02+5:30

बाळाभाऊपेठ झोपडपट्टीत मंगळवारी पहाटे पोलिसांनी छापा घालून दोन कुख्यात गुन्हेगारांना पकडले. त्यांच्याकडून तब्बल २० तलवारी जप्त करण्यात आल्या. लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला काही तासांचा अवधी उरला असताना सापडलेल्या या शस्त्रसाठ्यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

Stalk of swords seized in Panchpawali at Nagpur | नागपुरातील पाचपावलीत तलवारींचा साठा जप्त

नागपुरातील पाचपावलीत तलवारींचा साठा जप्त

Next
ठळक मुद्दे२० तलवारींचा साठा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बाळाभाऊपेठ झोपडपट्टीत मंगळवारी पहाटे पोलिसांनी छापा घालून दोन कुख्यात गुन्हेगारांना पकडले. त्यांच्याकडून तब्बल २० तलवारी जप्त करण्यात आल्या. लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला काही तासांचा अवधी उरला असताना सापडलेल्या या शस्त्रसाठ्यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
लोकसभा निवडणुकीचा प्रचार टोकाला पोहोचला असून, या प्रचारात काही गुंड आणि उपद्रवी मंडळीही सहभागी झाली आहे. या समाजकंटकांकडून मतदान प्रक्रियेत खोडा घातला जाऊ शकतो, हे ध्यानात आल्याने शहर पोलिसांनी वेगवेगळ्या पद्धतीच्या उपाययोजना अमलात आणल्या आहेत. झोपडपट्ट्यांमधील अवैध धंदे करणारे, दारू विक्री करणारे तसेच गुंडांच्या हालचालींवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. रात्रीच्या वेळी विविध झोपडपट्ट्यांमध्ये पोलीस कसून तपासणी करीत आहेत. पाचपावलीचे पोलीस अशाच प्रकारे मंगळवारी पहाटे ४ च्या सुमारास बाळाभाऊपेठ झोपडपट्टीत कोम्बिंग आॅपरेशन करीत असताना त्यांना या भागातील कुख्यात गुन्हेगार प्रणय सुधाकर पाटील आणि संग्राम ऊर्फ राजा पाठक यांनी मोठ्या प्रमाणात घातक शस्त्रांची जमवाजमव केल्याचे कळले. या माहितीनंतर पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाचपावली पोलिसांनी कुख्यात संग्राम पाठक याच्या घरी मंगळवारी पहाटे ४ वाजता छापा घातला. यावेळी तेथे संग्रामसोबतच कुख्यात प्रणय पाटीलही मिळाला. या दोघांना ताब्यात घेऊन घरझडती घेतली असता संग्रामच्या घरात तब्बल २० तलवारी आढळल्या. त्या जप्त करण्यात आल्या. पाचपावलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक मेश्राम, सहायक निरीक्षक सुरोसे, हवालदार विजय यादव, नायक राजेश देशमुख, विलास चव्हाण आणि महेश जाधव यांनी ही कामगिरी बजावली.
प्रणय पाटील हिस्ट्रीशिटर गुन्हेगार
पोलिसांनी अटक केलेला प्रणय सुधाकर पाटील या हिस्ट्रीशिटर गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध विविध प्रकारचे १६ गंभीर गुन्हे दाखल आहेत तर, संग्राम पाठकविरुद्ध दोन गुन्हे दाखल आहेत. त्यांना आज न्यायालयात हजर करून त्यांचा पोलिसांनी दोन दिवसांचा पीसीआर मिळवला. पाचपावली पोलिसांनी दीड महिन्यापूर्वी पंजाबमधील शस्त्रतस्कर परमजितसिंग पटिये याला अटक करून त्याच्याकडून १० तलवारी जप्त केल्या होत्या. कुख्यात प्रणय आणि संग्रामचे पटियेसोबत गुन्हेगारी कनेक्शन प्राथमिक तपासात उघड झाले आहे. त्यामुळे या गुन्ह्यात पोलीस पटियेलाही अटक करण्याच्या प्रयत्नात आहे.

 

 

Web Title: Stalk of swords seized in Panchpawali at Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.