स्थायी समितीची मंजुरी : गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन
By admin | Published: May 17, 2015 02:56 AM2015-05-17T02:56:17+5:302015-05-17T02:56:17+5:30
गोसेखुर्द प्रकल्पामुळे कुही व भिवापूर तालुक्यातील २५ गावे बाधित झालेली आहेत. या गावांचे पुनर्वसन करण्यात आले ...
नागपूर : गोसेखुर्द प्रकल्पामुळे कुही व भिवापूर तालुक्यातील २५ गावे बाधित झालेली आहेत. या गावांचे पुनर्वसन करण्यात आले असून नवीन १७ ग्रामपंचायती निर्माण करण्याला जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत शनिवारी मंजुरी देण्यात आली.
प्रकल्पामुळे बाधित झालेल्या गावात नवीन ग्रामपंचायती स्थापन करण्याबाबतचे प्रस्ताव पाठविण्याचे शासन निर्देश आहेत. यासाठी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची मंजुरी आवश्यक आहे. कुही व भिवापूर पंचायत समितीने यांनी पाठविलेल्या प्रस्तावांना मंजुरी दिल्याची माहिती अध्यक्ष निशा सावरकर यांनी दिली.
कुही तालुक्यात नवीन स्थापन करण्यात येणाऱ्या ग्रामपंचायतीत तुडका, बाम्हणी , गोठणगाव-पांढरगोटा-राजोली, पिंपरीमुंजे-गोंडपिंपरी-धामणी, हरदोली, म्हसली, पौनी, फेगड, गोन्हा-चिखली, सावंगी, नवेगाव-चिंचघाट, भिवापूर तर भिवापूर तालुक्यातील थुटानबोरी, मोखेबर्डी, -किन्हीकला-किन्हीखुर्द, किटाळी, नेरी-सावरगाव व शेगाव(सो) आदी पुनर्वसित ग्रामपंचायतींचा समावेश आहे.गोसेखुर्द प्रकल्पामुळे कुही तालुक्यातील १७ तर भिवापूरमधील ८ गावे बाधित झालेली आहेत.(प्रतिनिधी)