‘स्टार’ अनफिट

By admin | Published: November 14, 2014 12:47 AM2014-11-14T00:47:05+5:302014-11-14T00:47:05+5:30

शहरवासीयांच्या सुरक्षित प्रवासाची जबाबदारी महापालिकेच्या स्टार बसची आहे, परंतु वंश इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडच्या (व्हीएनआयएल) या स्टार बसेस अनफिट असल्याचे प्रादेशिक परिवहन

'Star' unfit | ‘स्टार’ अनफिट

‘स्टार’ अनफिट

Next

आरटीओने केल्या सहा बसेस जप्त : प्रवाशांची गैरसोय
नागपूर : शहरवासीयांच्या सुरक्षित प्रवासाची जबाबदारी महापालिकेच्या स्टार बसची आहे, परंतु वंश इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडच्या (व्हीएनआयएल) या स्टार बसेस अनफिट असल्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (शहर) तपासणीत गुरुवारी आढळून आले. आज पहिल्याच दिवशी सहा बसेस जप्त केल्या असून १२ बसेसला नोटीस बजावली आहे.
व्हीएनआयएल या कंपनीच्या स्वत:च्या २३० तर जेएनयूआरएमच्या २४० बसेस आहेत. एकूण ४७० बसेसपैकी सुमारे दोनशेवर बसेस कार्यरत आहे. उर्वरित बसेस बंद आहेत. सूत्रानुसार, ज्या बसेस प्रवाशांना घेऊन रस्त्यावर धावत आहेत त्यातील ४० टक्के बसेसना आरटीओचे फिटनेस सर्टिफिकेटच नाही. अशा बसेस प्रवाशांसोबतच नागरिकांसाठीही धोकादायक ठरत आहे. आरटीओ कार्यालयाला आलेल्या तक्रारीवरून आजपासून कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली. आरटीओने आज पकडलेल्या सर्वच बसेसला फिटनेस सर्टिफिकेट नव्हते. यातील एका बसमध्ये तर पायदानवर खड्डा होता. यामुळे कधीही धोका होण्याची शक्यता होती. इतर बसेसमध्ये ब्रेक, लाईट्स, आसन व्यवस्था, टायर आदी मुख्य समस्या होत्या. आरटीओच्या या विशेष मोहिमेमुळे प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली.
प्रवाशांना बराच वेळपर्यंत दुसऱ्या बसेसची प्रतीक्षा करावी लागली. आरटीओची ही कारवाई प्रादेशिक परिवहन अधिकारी (शहर) सर्जेराव शेळके यांच्या मार्गदर्शनात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (शहर) विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.(प्रतिनिधी)

Web Title: 'Star' unfit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.