स्टारबस चालक व विद्यार्थ्यांमध्ये मारपीट

By admin | Published: January 8, 2016 03:46 AM2016-01-08T03:46:37+5:302016-01-08T03:46:37+5:30

मोरभवन बसस्थानकावर स्टारबसचे चालक-वाहक व विद्यार्थ्यांमध्ये चांगलीच मारपीट झाली. या मारपीटमध्ये अमन पाटील हा विद्यार्थी जखमी झाला.

Starbus Driver and Student Strike | स्टारबस चालक व विद्यार्थ्यांमध्ये मारपीट

स्टारबस चालक व विद्यार्थ्यांमध्ये मारपीट

Next

एक विद्यार्थी जखमी : मोरभवन बसस्थानकातील घटना
नागपूर : मोरभवन बसस्थानकावर स्टारबसचे चालक-वाहक व विद्यार्थ्यांमध्ये चांगलीच मारपीट झाली. या मारपीटमध्ये अमन पाटील हा विद्यार्थी जखमी झाला. या प्रकारामुळे मोरभवन बसस्थानकावर चांगलाच गोंधळ निर्माण झाल्याने, सीताबर्डी पोलिसांनी जखमी विद्यार्थी व वाहनचालकाला ताब्यात घेतले.
विद्यार्थ्यांच्या सांगण्यानुसार दत्तवाडीकडे जाणाऱ्या बसचालकाला अमन पाटील या विद्यार्थ्याने बसमध्ये गर्दी झाली, बस लवकर काढा, अशी विनंती केली. परंतु बसचालकाने त्याला शिविगाळ केली. त्यामुळे दोघांमध्ये बाचाबाची झाली. बसचालकाने अमनला मारहाण केली. त्यात अमनच्या तोंडाला गंभीर दुखापत झाली.
दरम्यान स्टार बस चालकांच्या सांगण्यानुसार अमनने शिविगाळ केल्यामुळे चालक व अमनमध्ये बाचाबाची झाली. नंतर अमनसोबतच्या काही मुलांनी हमला करून बसचालक-वाहकांना मारहाण केली. त्यामुळे बसचालक व विद्यार्थ्यांमध्ये जोरदार मारपीट झाली. बसस्थानकावर या वादातून गोंधळ उडाल्याने, सीताबर्डी पोलिसांनी वाहनचालक भाऊराव रेवतकर व विद्यार्थी अमन पाटील याला ताब्यात घेतले.
विद्यार्थी नेहमीच ड्रायव्हर, कंडक्टरशी वादावादी करीत असल्याचा आरोप बसचालकांनी केला. तर बसचा कंडक्टर नेहमीच विद्यार्थ्यांशी वादावादी करीत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला.(प्रतिनिधी)

Web Title: Starbus Driver and Student Strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.