अजनी वनावरून महापाैरांनी ताेडले अकलेचे तारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:08 AM2021-06-25T04:08:13+5:302021-06-25T04:08:13+5:30

नागपूर : अजनी वनातील हजाराे झाडे वाचविण्यासाठी मागील आठ-दहा महिन्यापासून सुरू असलेल्या आंदाेलनादरम्यान गप्प राहिलेल्या महापाैर दयाशंकर तिवारी यांच्या ...

The stars of Akale were dropped by Mahapaira from Ajni forest | अजनी वनावरून महापाैरांनी ताेडले अकलेचे तारे

अजनी वनावरून महापाैरांनी ताेडले अकलेचे तारे

Next

नागपूर : अजनी वनातील हजाराे झाडे वाचविण्यासाठी मागील आठ-दहा महिन्यापासून सुरू असलेल्या आंदाेलनादरम्यान गप्प राहिलेल्या महापाैर दयाशंकर तिवारी यांच्या वक्तव्यावरून पर्यावरणवाद्यांमध्ये असंताेष पसरला आहे. महापाैरांनी ताेंड उघडून अकलेचे तारे ताेडल्याची संतप्त भावना पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केली.

महापाैर तिवारी यांनी माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत ‘अजनीवन‘या शब्दाचीच खिल्ली उडवली. अजनी हे वन कधीपासून झाले हेच कळत नसल्याचे सांगत, वनासोबतच प्राणी असले तरच वन संबाेधले जाते, असे मत मांडले. २०१७ मध्ये जेव्हा हा प्रकल्प मंजूर झाला तेव्हा कोविड कुठे होता, ऑक्सिजनचा प्रश्‍न कुठे होता, असे चमत्कारिक विधान त्यांनी केले. या वक्तव्यावरून पर्यावरण कार्यकर्त्यांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले. शहराचे प्रथम नागरिक म्हणून मान असलेल्या महापाैरांवर शहराची जबाबदारी निश्चित असते. त्यात पर्यावरणही महत्त्वाचा विषय आहे. शहराचे हरित क्षेत्र वाढविण्यासाठी ठिकठिकाणी वृक्षाराेपण करणे, उद्यान, साेसायट्या व माेकळ्या जागेत वृक्षाराेपण कार्यक्रमाची घाेषणा त्यांनी केली. शहरात ७५ ऑक्सिजन झोन तयार करण्याचे निर्देश देत पोहरा नदी काठालगत पिंपळ, वड, चिंच, कडुलिंबाचे वृक्ष् लावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. मग अजनीवनाबाबत दुटप्पीपणा का, असा सवाल अनसूया काळे-छाबरानी यांनी केला.

एनएचएआयच्या आयएमएस प्रकल्पाच्या ४४ एकराच्या पहिल्या टप्प्यात मनपाच्यानुसार ४९३० झाडे ताेडली जाणार आहेत. पर्यावरणवाद्यानुसार हा आकडा १० हजार आहे व चार टप्प्यात ४० हजारावर झाडांची कत्तल हाेणार आहे. याचे भान महापाैरांना आहे का, असा सवाल पर्यावरणवादी शरद पालिवाल यांनी केला. नासुप्रकडून घेतलेली उद्याने मनपाला सांभाळता आली नाही आणि महापाैर अजनी वनच्या माेबदल्यात पाचपट झाडे लावण्याचे वक्तव्य करून नागपूरकरांची दिशाभूल करीत असल्याचा आराेप त्यांनी केला. अजनीवनाला वन संबाेधण्यावरून खिल्ली उडविणाऱ्या महापाैरांना वृक्षसंवर्धन कायदा माहीत आहे का, अशी घणाघाती टीका पालिवाल यांनी केली.

अजनीवनात वटपाैर्णिमा ()

अजनीवनातील झाडाचे संवर्धन व्हावे यासाठी नागपूर शहरातील नागरिकांनी व महिलांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी अजनीवन परिसरात वटसावित्री उत्सव साजरा केला. मनसेच्या शहर अध्यक्ष मनिषा पापडकर यांच्या पुढाकाराने येथील १०० वर्ष जुन्या झाडांचे वटवृक्षांचे पूजन करण्यात आले. काेराेना काळात प्रत्येकाला प्राणवायूचे महत्त्व कळले आहे. मात्र प्रशासनातर्फे विकासाच्या नावाने नि:शुल्क प्राणवायू देणारी हजाराे झाडे ताेडण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा आराेप पापडकर यांनी केला. यावेळी अचला मेसन, शहर सचिव अर्चना कडू, शालूताई गजरे, सहसचिव स्वाती जैस्वाल, मंजुषा पानबुडे, पुनम चाडगे, शालू इंगळे असंख्य पदाधिकारी व अनेक तरुणी उपस्थित होत्या.

Web Title: The stars of Akale were dropped by Mahapaira from Ajni forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.