खाप्यात काेविड केअर सेंटर सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:08 AM2021-04-27T04:08:35+5:302021-04-27T04:08:35+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क खापा : शहर व परिसरातील गावांमध्ये काेराेना रुग्णांची संख्या वाढत आहे. सार्वजनिक पातळीवर उपचाराची साेय नसून, ...

Start a Cavid Care Center in Khapa | खाप्यात काेविड केअर सेंटर सुरू करा

खाप्यात काेविड केअर सेंटर सुरू करा

googlenewsNext

लाेकमत न्यूज नेटवर्क

खापा : शहर व परिसरातील गावांमध्ये काेराेना रुग्णांची संख्या वाढत आहे. सार्वजनिक पातळीवर उपचाराची साेय नसून, शहरामधील रुग्णालयात खाटांची कमतरता आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांचे हाल हाेत आहे. त्यामुळे खापा येथे काेविड केअर सेंटर सुरू करण्याची मागणी शिव भवानी फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनी केली आहे.

खापा (ता. सावनेर) शहराची लाेकसंख्या १७ हजाराच्या वर आहे. शहरासह ग्रामीण भागात काेराेनाचे संक्रमण वाढत आहे. त्यातच शासकीय रुग्णालयांमध्ये खाटा व औषधांची कमतरता जाणवायला सुरुवात झाल्याने तसेच खासगी रुग्णालयांमध्ये उपचार करणे आर्थिकदृष्ट्या परवडण्याजाेगे नसल्याने गरीब रुग्णांचे हाल हाेत आहे. त्यांची साेय व्हावी म्हणून शहरात किमान एक काेविड केअर सेंट सुरू करावे तसेच काेराेनामुक्तीसाठी प्रत्येकाने लसीकरण करवून घ्यावे यासाठी शहरात माहिती व सूचना कक्षाची निर्मित करावी, अशी मागणी अमन बागडे, प्रशांत उमाळे, आशीष ढाले, सतीश रेवतकर, चेतना खंडाळे, दामिनी कोल्हे, जगदीश तायवाडे, संकेत सुरजुसे, मोक्षदा कांबळी, राहुल लांबट यांच्यासह नागरिकांनी केली आहे.

....

हालचाली सुरू

आठवडाभरात खापा शहरात दाेन खसगी काेविड केअर हाॅस्पिटल सुरू हाेणार असून, त्याआधी काेविड केअर सेंटर सुरू करावयाचे आहे. यासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाची मागणी शासनाकडे केली आहे. मनुषबळ उपलब्ध झाले की सेंटर व हाॅस्पिटल तातडीने सुरू केले जाईल, अशी माहिती नगर पालिकच्या मुख्याधिकारी डाॅ. ऋचा धाबर्डे यांनी दिली. दुसरीकडे, काेविड केअर सेंटरबाबत आपल्याला अद्याप काेणतीही सूचना प्राप्त झाली नसल्याचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. वर्षा शंकरवार यांनी स्पष्ट केले.

Web Title: Start a Cavid Care Center in Khapa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.