रामटेकमध्ये काेविड सेंटर सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:09 AM2021-04-02T04:09:01+5:302021-04-02T04:09:01+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : तालुक्यात काेराेनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दुसरीकडे खासगी रुग्णालयात माेठ्या प्रमाणात आर्थिक लूट हाेत ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : तालुक्यात काेराेनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दुसरीकडे खासगी रुग्णालयात माेठ्या प्रमाणात आर्थिक लूट हाेत आहे. त्यामुळे काेराेना रुग्णांच्या उपचारासाठी व जीवितहानी टाळण्यासाठी रामटेक येथे काेविड केअर सेंटर सुरू करा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. यासंदर्भात राहुल काेठेकर व दामाेधर धाेपटे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना तहसीलदारांमार्फत निवेदन साेपविले आहे.
रामटेक शहर व ग्रामीण भागात आतापर्यंत १,८०२ काेराेना रुग्णांची नाेंद करण्यात आली आहे. यात ५१ रुग्णांचा मृत्यू झाला. काेराेनाबाधितांची ही संख्या दिवसेंदिवस वाढत असून, काेविड सेंटरअभावी रुग्णांची माेठी गैरसाेय हाेत आहे. पायाभूत सुविधा नसताना दिशाभूल करून खासगी दवाखान्यात भरती हाेण्याचे सांगितले जाते व रुग्णांकडून अवाढव्य रक्कम वसूल केली जात असल्याची नागरिकांची ओरड आहे. शिवाय, परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर रुग्णांना नागपूरला हलविले जाते. यामुळे गाेरगरीब रुग्णांचे बेहाल हाेत आहे. त्यामुळे रामटेक येथे किमान १०० खाटांचे काेविड केअर सेंटर सुरू करावे, जेणेकरून शहर व तालुक्यातील गाेरगरिबांना काेराेना महामारीवर उपचार करणे साेईचे हाेईल, अशी मागणी निवेदनातून केली आहे.
याबाबत नागरिकांनी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्याशी चर्चा केली असता, त्यांनी शक्य तितक्या लवकर काेविड केअर सेंटर सुरू केले जाईल. काेराेनावर मात करण्यासाठी नागरिकांनीसुद्धा सहकार्य करावे, लवकरच केअर सेंटर सुरू हाेईल, असेही त्यांनी सांगितले. ताप, सर्दी, खाेकला अशी लक्षणे आढळल्यास त्वरित काेराेनाची चाचणी करावी व पाॅझिटिव्ह अहवाल आल्यास स्वत:ला इतरांपासून दूर ठेवावे, असे आवाहन उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. उजगडे यांनी यावेळी केले. तहसीलदारांकडे निवेदन देताना राहुल काेठेकर, दामाेधर धाेपटे, मयंक देशमुख, वसीम कुरेशी, व्ही. एच. दुंडे, अभिषेक डाहारे, सुशांत राले, स्नेहदीप वाघमारे, चंद्रभान शिवरकर, अंकित टक्कामाेरे, अजय मेहरकुळे, राहुल काटोले, सागर धावडे, समीर शेख, अनुप सावरकर, महेंद्र नागपुरे, योगेश कछवाह आदी उपस्थित हाेते.