न.प.शाळेत कोविड विलगीकरण केंद्र सुरु करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:09 AM2021-04-08T04:09:59+5:302021-04-08T04:09:59+5:30
काटोल : काटोल शहर व ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. रुग्णांची वाढती संख्या बघता, एका विलगीकरण केंद्रामध्ये ...
काटोल : काटोल शहर व ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. रुग्णांची वाढती संख्या बघता, एका विलगीकरण केंद्रामध्ये सध्या व्यवस्था होणे शक्य नाही. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयाजवळ असलेल्या नगर परिषद शाळा क्रमांक ७ येथे विलगीकरण केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी काटोल नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते संदीप नानाजी वंजारी यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे. ही शाळा ग्रामीण रुग्णालयाजवळच असल्याने डॉक्टरांना सेवा देणे सोईचे होईल. येथे रुग्णांची गैरसोय होणार नाही. लोकसहभागातून हे विलगीकरण केंद्र उभारण्याचा प्रस्तावही वंजारी यांनी दिला आहे. शहरात कोरोना संक्रमणाचे प्रमाण कमी आहे. अशात बाधित रुग्णांच्या घराबाहेर फलक लावणे नगर परिषदेने बंद केले आहे. त्यामुळे कोण बाधित आहे, ते परिसरामधील नागरिकांना कळत नाही. शहरात कोरोनाबाधित रुग्णांचा मुक्त संचार सुरू आहे. त्यामुळे संक्रमणवाढीचा धोका अधिक वाढला आहे. त्यामुळे न.प.प्रशासन आणि आरोग्य प्रशासनाने शहरातील संक्रमण आटोक्यात आणण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींची मदत घ्यावी, अशीही मागणी वंजारी यांनी केली आहे.