५० टक्के क्षमतेने मंगल कार्यालये सुरू करा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:10 AM2021-03-26T04:10:00+5:302021-03-26T04:10:00+5:30
नागपूर : शहरातील मंगल कार्यालय, लॉन ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवण्याची अनुमती देण्यात यावी, अशी मागणी नागपूर मंगल कार्यालय ...
नागपूर : शहरातील मंगल कार्यालय, लॉन ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवण्याची अनुमती देण्यात यावी, अशी मागणी नागपूर मंगल कार्यालय असोसिएशनने केली आहे. गेल्या वर्षी १८ मार्च राेजी पहिला लाॅकडाऊन लागल्यापासून मंगल कार्यालये बंद करण्यात आली आहेत. लग्नाचा पूर्ण सीजन गेल्याने मालकांना आर्थिक अडचणी सहन कराव्या लागत आहेत. हाॅटेल, रेस्टाॅरेंट, बार, एसटी व विमानाचा प्रवास सुरू असताना सभागृहच का बंद ठेवण्यात येत आहेत, असा सवाल असाेसिएशनने केला. घरी कार्यक्रम घेण्यास परवानगी दिल्यास संसर्गाचा अधिक धाेका असताना सभागृहांवर बंदी घालण्यात आली आहे. मंगल कार्यालय, लॉनमधील नोकरदारांचे वेतन, विद्युत बिल, प्रॉपर्टी टॅक्स, कर्जाचे हप्ते भरणे कठीण होऊन बसले आहे. सभागृह-लॉन पूर्णपणे बंद ठेवायचा असेल, तर होणाऱ्या नुकसानाची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. पत्रपरिषदेला संघटनेचे अध्यक्ष उमाकांत जट्टेवार, सचिव विजय तलमले, सहसचिव राजा देवसरकर, संजय काळे, कोषाध्यक्ष देशमुख, बंडू राऊत, ललित वोरा, सुधाकर बैतुले आणि विनोद कनकदंडे उपस्थित होते.