नियमानुसार मशिदी सुरू करा : सुरक्षेचे पालन करून नमाज पठण होऊ शकते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2020 10:07 PM2020-11-03T22:07:52+5:302020-11-03T22:11:32+5:30

Appeal for open Mosque , Nagpur news शासनाने ३० नोव्हेंबरपर्यंत मशिदी बंद ठेवण्याचे आदेश दिले. परंतु शहरातील मशीद व्यवस्थापन समित्यांनी सरकारच्या आदेशाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

Start a mosque as per the rules: Namaz can be recited by observing security | नियमानुसार मशिदी सुरू करा : सुरक्षेचे पालन करून नमाज पठण होऊ शकते

नियमानुसार मशिदी सुरू करा : सुरक्षेचे पालन करून नमाज पठण होऊ शकते

googlenewsNext
ठळक मुद्देव्यवस्थापन समितीमध्ये नाराजी, इमाम व मोअज्जन अडचणीत

लोकमत  न्यूज  नेटवर्क 

नागपूर : शहरात कोरोनाचा असर अजूनही कायम आहे. पण परिस्थिती हळूहळू सामान्य होत आहे. त्यामुळे शासनाने मॉल, बार, सिनेमाघर, बाजार सुरू करण्यास परवानगी दिली. परंतु मशिदीमध्ये संक्रमणाचा धोका असल्याचे सांगून मशिदीचे दार बंद केले. मशिदी बंद असल्यामुळे तिथे राहणारे इमाम व मोअज्जन यांच्यावर संकट आले आहे. शासनाने ३० नोव्हेंबरपर्यंत मशिदी बंद ठेवण्याचे आदेश दिले. परंतु शहरातील मशीद व्यवस्थापन समित्यांनी सरकारच्या आदेशाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

शहरातील काही मशीद व दरगाहच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली असता, त्यांनी सांगितले की, कोरोना महामारीपासून बचाव करण्यासाठी खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, सॅनिटायझर यासह आवश्यक सावधगिरी बाळगून नमाज करणाऱ्यांना मशिदीत प्रवेश दिला जाऊ शकतो. गेल्या सात महिन्यापासून मशिदी बंद असल्याने येथील इमाम व मोअज्जन यांच्यावर संकट आले आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांच्या अडचणी येत आहेत. काही मशीद कमिटींना त्यांना वेतन देणे कठीण झाले आहे. त्याचबरोबर मशिदीत सेवारत कर्मचारीसुद्धा अडचणीत आले आहेत. मशीद व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, मशिदीत काही कालावधीसाठी नमाज पठण करणारे येतात. यादरम्यान सुरक्षेच्या उपाययोजना करून नमाज पठण करता येऊ शकते.

आम्ही नियमाचे पालन करू

सरकारने जसे मॉल, बाजारसह अन्य स्थळ सुरू करण्याची परवानगी दिली आहे, त्याच धर्तीवर मशीद सुरू करण्याची परवानगी दिली जाऊ शकते. नमाजींना सुरक्षित अंतराचे पालन करीत प्रवेश दिला जाऊ शकतो. सात महिने लोटल्यानंतरही आता नमाजींची अपेक्षा आहे की मशिदी सुरू व्हाव्यात. सरकारला सकारात्मक निर्णय घेणे गरजेचे आहे.

 हाफीज अताउर्रहमान रजवी, इमाम मशीद गरीब नवाजनगर

नियमानुसार परवानगी द्या

कोरोना असल्याने सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. कारण प्रकोप आणखी वाढत आहे. पण जर मॉल, बाजारसह अनेक सार्वजनिक स्थळांना परवानगी दिली आहे तर मशीद उघडण्यासही परवानगी देणे गरजेचे आहे. नियमाचे पालन केल्यास हे शक्य आहे.

 मौलाना अब्दुल कबीर, खतीब मशीद मोहीयुद्दीन

Web Title: Start a mosque as per the rules: Namaz can be recited by observing security

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.