माझ्या होर्डिंंग्जपासून सुरुवात करा; अतिक्रमणविरुद्धच्या कारवाईत नागपूरच्या महापौरांचे स्पष्ट निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2019 10:55 AM2019-12-04T10:55:09+5:302019-12-04T10:55:47+5:30

शहरातील विविध भागात अवैधरीत्या होर्डिंग लावून शहर विद्रुप करणाऱ्यांविरोधात मंगळवारी कारवाई सुरू करण्यात आली.

Start with my hoardings; Clear instructions from the mayor of Nagpur in the action against encroachment | माझ्या होर्डिंंग्जपासून सुरुवात करा; अतिक्रमणविरुद्धच्या कारवाईत नागपूरच्या महापौरांचे स्पष्ट निर्देश

माझ्या होर्डिंंग्जपासून सुरुवात करा; अतिक्रमणविरुद्धच्या कारवाईत नागपूरच्या महापौरांचे स्पष्ट निर्देश

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील विविध भागात अवैधरीत्या होर्डिंग लावून शहर विद्रुप करणाऱ्यांविरोधात मंगळवारी कारवाई सुरू करण्यात आली. नेहरूनगर झोन क्षेत्रातील अवैध होर्डिंगवर कारवाई करण्यात आली. यात अवैधरीत्या लावण्यात आलेल्या महापौरांच्या अभिनंदनाच्या होर्डिंगवर पथकाने जेसीबी चालविला.
उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अवैध होर्डिंगविरोधात सक्त कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सोमवारी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सर्व अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते. आयुक्तांच्या निर्देशानुसार मंगळवारी नेहरूनगर झोनच्या पथकाने अवैध होर्डिग काढण्याबाबत धडक कारवाई सुरू केली.
नेहरूनगर झोन क्षेत्रात ठिकठिकाणी महापौर संदीप जोशी यांचे अभिनंदन करणारे फलक अवैधरीत्या लावण्यात आल्याचे दिसून आले. विद्युत खांबावरील व अन्य ठिकाणी लावण्यात आलेल्या महापौरांच्या होर्डिंगवर जेसीबी चालविण्यात आला. मनपा पथकाद्वारे अवैध होर्डिंग विरोधातील कारवाई करणाऱ्या पथकाचे संदीप जोशी यांनी अभिनंदन केले आहे. नियम सर्वांना सारखे असून नियमाचे उल्लंघन करणारी व्यक्ती कुणीही असली तरी त्यावर कारवाई करणे आवश्यक आहे. नियमाचे उल्लंघन करणाऱ्या कुठल्याही पदाधिकाऱ्याची भीती न बाळगता त्यांच्यावर होणारी कारवाई ही स्वागतार्हच आहे, अशा शब्दांत महापौरांनी पथकाचे कौतुक केले. शहरात विद्युत खांब, सिग्नल, झाडे, इलेक्ट्रिक डीपी बॉक्स, शाळा, महाविद्यालय, सार्वजनिक ठिकाणी अवैधरीत्या होर्डिग लावले जात आहेत. अशा सर्व अवैध होर्डिंगवर कारवाई करण्याचे निर्देशही महापौरांनी दिले.

माझ्या होर्डिंगपासून सुरुवात करा
अवैध होर्डिंगवर कारवाई करताना महापालिकेच्या पथकावर राजकीय दबाव येतो. या दबावाला न जुमानता पथकाला होर्डिग हटविण्याची कारवाई करता यावी, यासाठी महापौर संदीप जोशी यांनी त्यांच्या अभिनंदनाच्या होर्डिंगपासून कारवाईला सुरुवात करा, असे निर्देश दिले होते. यामुळे पथकाचे मनोबल वाढले आहे.

Web Title: Start with my hoardings; Clear instructions from the mayor of Nagpur in the action against encroachment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.