नागपूर-छिंदवाडा रेल्वे सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:09 AM2021-02-08T04:09:23+5:302021-02-08T04:09:23+5:30

सावनेर : लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर प्रशासनाने बसची वाहतूक सुरू केली आहे. वाहतुकीची प्रभावी व पुरेशी साधने नसल्याने गरीब नागरिकांची ...

Start Nagpur-Chhindwara railway | नागपूर-छिंदवाडा रेल्वे सुरू करा

नागपूर-छिंदवाडा रेल्वे सुरू करा

googlenewsNext

सावनेर : लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर प्रशासनाने बसची वाहतूक सुरू केली आहे. वाहतुकीची प्रभावी व पुरेशी साधने नसल्याने गरीब नागरिकांची गैरसोय होत असल्याने नागपूर- छिंदवाडा (मध्य प्रदेश) मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

मध्य प्रदेशातील सीमावर्ती भागात राहणारे शेकडो कामगार नागपूर जिल्ह्यात रोजगारासाठी येतात. शिवाय, या भागातील व्यापारी व शेतकरी खरेदी-विक्रीसाठी मध्य प्रदेशात जातात. नागपूर-छिंदवाडा मार्गावरील रेल्वे सध्या बंद असल्याने त्यांना वाहतुकीस अडचणी येत आहेत. ही रेल्वे बंद असल्याने भाजीपाला व फळे तसेच दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्रेत्यांची गैरसाेय होत आहे. शिवाय, या मार्गावरील रेल्वेस्थानक परिसरात फळे, नाश्ता, चहा व इतर वस्तूंची विक्री करून उदरनिर्वाह करणारे आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे ही समस्या सोडविण्यासाठी या मार्गावरील रेल्वे तातडीने सुरू करण्याची मागणी ग्रामीण भागातील प्रवाशांनी केली आहे.

Web Title: Start Nagpur-Chhindwara railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.