निर्माणाधीन सार्वजनिक शाैचालय सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:09 AM2021-03-16T04:09:48+5:302021-03-16T04:09:48+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कुही : शहरातील प्रभाग क्र. १३ मध्ये निर्माणाधीन अवस्थेत असलेल्या सार्वजनिक शाैचालयाचे काम तातडीने पूर्ण करून ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कुही : शहरातील प्रभाग क्र. १३ मध्ये निर्माणाधीन अवस्थेत असलेल्या सार्वजनिक शाैचालयाचे काम तातडीने पूर्ण करून ते सुरू करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. याबाबत नागरिकांच्या शिष्टमंडळाने नगर पंचायत प्रशासनाकडे नुकतेच निवेदन साेपविले आहे.
तत्कालीन ग्रामपंचायत काळापासून निर्माणाधीन अवस्थेत असलेले शाैचालय पंचायत समितीतर्फे बांधून देण्यात आले हाेते. मात्र हे बांधकाम अद्यापही अपूर्ण असून, प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष हाेत आहे. परिणामी, गेल्या ७-८ वर्षांपासून हे शाैचालय जैसे थेच आहे. या शाैचालयात सेफ्टी टॅंक बांधले नसून, दरवाजेही लावल्या गेली नाहीत. त्यामुळे हे शाैचालय पांढरा हत्तीच ठरत आहे.
ग्रामपंचायतला नगर पंचायतचा दर्जा मिळाल्यानंतर वारंवार पाठपुरावा करीत हे शाैचालय पंचायत समितीकडून नगर पंचायतला हस्तांतरित करण्यात आले. त्यामुळे नगर पंचायत प्रशासनाने हे सार्वजनिक शाैचालय सुविधांनी सज्ज करून तातडीने सुरू करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदन देतेवेळी शिष्टमंडळात कविता राजू गजभिये, बेबी सूर्यवंशी, किरण वैरागडे, कल्पना पवार, प्रीतिन वासनिक, वनिता बाेंद्रे, महादेव पडाेळे, वृंदा चकाेले. प्रमिला सायताेंडे, साेनू अंधारे, किसन काेटांगळे आदींचा समावेश हाेता.