मेडिकलमध्ये शिवथाळी सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:27 AM2020-12-16T04:27:11+5:302020-12-16T04:27:11+5:30
थॅलेसेमिया रुग्णांची रक्तासाठी भटकंती नागपूर : कोरोनामुळे महाविद्यालये बंद आहेत. अनेक कॉर्पाेरेट कंपन्यांचे ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू आहे. मेळावे ...
थॅलेसेमिया रुग्णांची रक्तासाठी भटकंती
नागपूर : कोरोनामुळे महाविद्यालये बंद आहेत. अनेक कॉर्पाेरेट कंपन्यांचे ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू आहे. मेळावे घेणे बंद आहेत. याचा फटका रक्तदान शिबिरांना बसला आहे. स्वेच्छा रक्तदानाची संख्याही कमी झाली आहे. यामुळे शासकीयसह खासगी रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा जेमतेम साठा आहे. परिणामी, थॅलेसेमिया व सिकलसेलच्या रुग्णांवर भटकंतीची वेळ आली आहे.
जळगावचे निरीक्षक तपासणार नागपूरची वाहने
नागपूर : ओव्हरलोड व खासगी प्रवासी वाहनांवर प्रभावीपणे तपासणी करण्यासाठी वायुवेग पथकाचे चक्राकर पद्धतीने नियोजन करण्याचे परिवहन विभागाचे आदेश मंगळवारी धडकले. त्यानुसार आता जळगाव व व कोल्हापूर आरटीओ कार्यालयाचे मोटार वाहन निरीक्षक व सहायक निरीक्षक नागपुरात येऊन तपासणी करतील, तर नागपूर आरटीओ कार्यालयाचे निरीक्षक पुणे येथे तपासणी करतील.