मिहानमध्ये एम्सच्या बांधकामाला सुरुवात

By Admin | Published: July 16, 2016 03:08 AM2016-07-16T03:08:33+5:302016-07-16T03:08:33+5:30

मिहानमधील १५० एकरच्या जागेचे केंद्र शासनाच्या आरोग्य व कुुटुंब कल्याण मंत्रालयाकडे हस्तांतरण होताच

Starting with the construction of AIIMS in Mihan | मिहानमध्ये एम्सच्या बांधकामाला सुरुवात

मिहानमध्ये एम्सच्या बांधकामाला सुरुवात

googlenewsNext

वीज, चौपदरी रस्त्यासाठी १२ कोटीची मंजुरी
नागपूर : मिहानमधील १५० एकरच्या जागेचे केंद्र शासनाच्या आरोग्य व कुुटुंब कल्याण मंत्रालयाकडे हस्तांतरण होताच आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स)विकासाला गती मिळाली आहे. ‘हॉस्पिटल सर्व्हिसेस कन्सलटन्सी कॉर्पाेरेशन लिमिटेड’ने (एचएससीसी) संरक्षण भिंतीच्या कार्याला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, प्रस्तावित जागेवर वीज, पाणी व चौपदरी रस्ता उपलब्ध करून देण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. यासाठी नुकतेच १२ कोटी रुपयांना मंजुरी मिळाल्याची माहिती आहे.
मिहान प्रकल्पाच्या विशेष आर्थिक क्षेत्राबाहेरील सेक्टर २० मधील १५० एकर जमीन १.५ चटई क्षेत्रनिर्देशांकासह ‘एम्स’ स्थापन करण्याकरिता प्रस्तावित होती. ११ मार्च २०१६ रोजी शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागामार्फत केंद्र शासनाच्या आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालयास नाममात्र एक रुपया भाडेपट्ट्याने ९९ वर्षांकरिता ही जागा हस्तांतरित करण्यात आली. देशपातळीवर ‘एम्स’चे बांधकाम ‘आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय’अंतर्गत काम करणारी ‘एचएससीसी’ कंपनी करते. जागा हस्तांतरित होताच या कंपनीने ३० एप्रिलपासून एम्सच्या संरक्षण भिंतीच्या कामाला सुरुवात केली आहे. प्रस्तावित जागेवर वीज, पाणी व चौपदरी रस्ता या पायाभूत सोयी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. त्यानुसार १२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, या निधीतून सुमारे आठ कोटी रुपये दोन पदरी असलेल्या रस्त्याचे चौपदरी करण्यासाठी, खर्च केले जाणार आहे. तीन कोटी रुपयांमधून प्रस्तावित जागेवर असलेले उच्चदाबाचे विद्युत टॉवर हटविण्यात येईल, तर उर्वरित निधीतून जुनी संरक्षण भिंत पाडून त्या जागी आठ फूट उंच भिंत बांधण्यात येणार आहे. ‘एम्स’च्या विकासासंदर्भात नागपुरात ३ जुलै रोजी बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. त्यांनी दिलेल्या निर्देशामुळेच हा निधी मिळाल्याचेही बोलले जात आहे. (प्रतिनिधी)

 

Web Title: Starting with the construction of AIIMS in Mihan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.