उमरेड येथे हरभरा खरेदी केंद्र सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:08 AM2021-03-25T04:08:36+5:302021-03-25T04:08:36+5:30
उमरेड : नाफेडअंतर्गत हरभरा खरेदी केंद्र सुरू झाले असून, दोन दिवसात सुमारे ३०० क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला आहे. ...
उमरेड : नाफेडअंतर्गत हरभरा खरेदी केंद्र सुरू झाले असून, दोन दिवसात सुमारे ३०० क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला आहे. उमरेड विकास खंड सहकारी शेतकी खरेदी विक्री संस्थेच्या माध्यमातून सुरू झालेल्या शासकीय खरेदी केंद्रावर एकूण ६३१ शेतकऱ्यांनी अर्ज सादर केला आहे. यापैकी ४८५ शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. ५,१०० रुपये क्विंटल असे दर शासकीय केंद्रावर असून, ऑनलाईननुसार शेतकऱ्यांच्या शेतमालाची खरेदी होणार आहे. काटापूजन करीत हरभरा खरेदीचा शुभारंभ झाला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष गजानन झाडे, उपाध्यक्ष गुरुदेव गेडेकर, बाजार समितीचे सभापती रूपचंद कडू, विजय खवास, दिलीप राहाटे, सूरज इटनकर, घनश्याम नारनवरे, जयंत गिरडकर, व्यवस्थापक गजानन ढोले, रवी मलवंडे, सचिन कडू, अमोल भाकरे, संजय कटारे आदींची उपस्थिती होती. यावेळी काही शेतकऱ्यांचा सत्कारही करण्यात आला.