राष्ट्रधर्म कीर्तन महोत्सवाला आजपासून प्रारंभ

By Admin | Published: January 8, 2015 01:21 AM2015-01-08T01:21:29+5:302015-01-08T01:21:29+5:30

कीर्तन महोत्सव आयोजन समिती, महाल आणि राधागोविंद चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने राष्ट्रधर्म कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव ८ जानेवारी ते १३ जानेवारीपर्यंत

Starts Nationalism Kirtan Mahotsav from today | राष्ट्रधर्म कीर्तन महोत्सवाला आजपासून प्रारंभ

राष्ट्रधर्म कीर्तन महोत्सवाला आजपासून प्रारंभ

googlenewsNext

राधा गोविंद चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम : भव्य शोभायात्रेने होणार सुरुवात
नागपूर : कीर्तन महोत्सव आयोजन समिती, महाल आणि राधागोविंद चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने राष्ट्रधर्म कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव ८ जानेवारी ते १३ जानेवारीपर्यंत चिटणीस पार्क स्टेडियम येथे आयोजित करण्यात आला आहे. या कीर्तन परिसराला द्वितीय मधुराद्वैताचार्य श्री बाबाजी महाराज पंडित कीर्तन परिसर असे नाव देण्यात येणार आहे.
गुरुवार ८ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता चिटणीस पार्कमधून शोभायात्रा काढण्यात येणार आहे. शोभायात्रा महाल परिसरातून फिरविण्यात येणार आहे. यानंतर सायंकाळी ६ वाजता जितेंद्रनाथ महाराजांचे ‘देव, देश व धर्म’ विषयावर प्रवचन होईल. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून महापौर प्रवीण दटके, माजी खा. बनवारीलाल पुरोहित, रा. स्व. महानगदर संघचालक दिलीप गुप्ता आणि दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे संचालक डॉ. पीयूष कुमार उपस्थित राहतील. दररोज कीर्तनाची वेळ सायंकाळी ६. ३० वाजता राहील. ९ जानेवारीला नामवंत कीर्तनकार पुणे येथील रोहिणी माने-परांजपे यांचे ‘राष्ट्रमाता जिजाऊ’ विषयावर कीर्तन होईल. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सद्गुरुदास महाराज, आर्ट आॅफ लिव्हिंगचे स्वामी हार्दिक, खा. कृपाल तुमाने, आ. कृष्णा खोपडे, ज्येष्ठ पत्रकार मणिकांत सोनी यजमानपद भुषवतील. शनिवार १० जानेवारी रोजी कीर्तन महोत्सवातील दुसरे कीर्तन युवा पिढीतील कीर्तन जुगलबंदीकार मानसी व श्रेयस बडवे यांचे ‘बाजीप्रभु देशपांडे’ व संत नामदेव विषयावर कीर्तन होईल. याप्रसंगी स्वामी ब्रम्हस्थानंद, दत्ता महाराज, ज्येष्ठ पत्रकार श्रीपाद अपराजित, विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष सुदर्शन शेंडे, आ. अनिल सोले उपस्थित राहतील.
रविवार ११ जानेवारी रोजी अमळनेर येथील राष्ट्रीय कीर्तनकार योगेश्वर उपासनी महाराज यांचे क्रांतिवीर चाफेकर बंधू या विषयावर कीर्तन होईल. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे अशोक सिंघल, खा. अजय संचेती, शहर पोलीस आयुक्त के. के. पाठक, ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मणराव जोशी, आ. विकास कुंभारे उपस्थित राहतील. सोमवार १२ जानेवारी रोजी बीड येथील हिंदूधर्मभूषण कीर्तनकार भरतबुवा रामदासी यांचे धर्मवीर संभाजी राजे विषयावर कीर्तन होईल. याप्रसंगी केंद्रीय भुपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी, स्वामी छोटे बालकदास महाराज, ज्येष्ठ पत्रकार बाळ कुळकर्णी, आ. मिलिंद माने, उद्योजक विलास काळे यजमान म्हणून उपस्थित राहतील.
मंगळवार १३ जानेवारी रोजी पुणे येथील राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांचे आर्य चाणक्य विषयावर कीर्तन होईल. या कीर्तनानेच कीर्तन महोत्सवाचा समारोप होणार आहे. याप्रसंगी यजमान म्हणून माजी खा. दत्ता मेघे, आ. सुधाकरराव देशमुख, रा. स्व. संघाचे विदर्भ प्रांत सहसंघचालक राम हरकरे, अंकुर सीड्सचे संचालक विजय काशीकर आणि ज्ञानेश्वर रक्षक उपस्थित राहतील. महोत्सवासाठी आकर्षक भव्य व्यासपीठ आणि पाच हजार कीर्तनप्रेमींच्या आसनाची व्यवस्था करण्यात आली आहे. पार्किंग व्यवस्था चिटणीस पार्कच्या मागील भागात आणि न्यू इंग्लिश हायस्कूल, महाल येथे करण्यात आली आहे. महोत्सव यशस्वी करण्यासाठी समितीचे संयोजक श्रीपाद रिसालदार, दिगंबरबुवा नाईक, अनिल देव, संजय चिंचोळे, निरंजन रिसालदार आदींचे परिश्रम असून दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचेही सहकार्य लाभले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Starts Nationalism Kirtan Mahotsav from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.