नागपुरातील १५ हजार फेरीवाल्यांपुढे उदरनिर्वाहाचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 11:34 PM2020-04-18T23:34:57+5:302020-04-18T23:37:12+5:30

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊ न सुरू आहे. कामकाज व व्यवसाय ठप्प असल्याने हातावर पोट असणाऱ्यापुढे गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे.

Starving distress before 15,000 Street Vendors in Nagpur | नागपुरातील १५ हजार फेरीवाल्यांपुढे उदरनिर्वाहाचे संकट

नागपुरातील १५ हजार फेरीवाल्यांपुढे उदरनिर्वाहाचे संकट

Next
ठळक मुद्देदीड महिन्यापासून व्यवसाय ठप्प : साहित्य पुरवणाऱ्या लघु उद्योजकांवरही संक्रांत

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊ न सुरू आहे. कामकाज व व्यवसाय ठप्प असल्याने हातावर पोट असणाऱ्यापुढे गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे. नागपूर शहरातील १५ हजार फेरीवाले व त्यांना साहित्य पुरविणारी लघु उद्योजक कुटुंबे गंभीर आर्थिक संकटात सापडल्याने त्यांच्यापुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
शहरातील प्रमुख बाजारपेठा, चौक व रस्त्यांच्या कडेला व्यवसाय करून फेरीवाले आपला उदरनिर्वाह करतात. यात सीताबर्डी, महाल, मध्यवर्ती बसस्थानक, इतवारी, मस्कासाथ, शहीद चौक, गांधीबाग, दहीबाजार, खामला, सदर, आशीर्वादनगर, दिघोरी, जिल्हा मुख्यालय, जरीपटका मार्केट, गोकूळपेठ, रामनगर, सेमिनरी हिल्स, एमआयडीसी, सक्करदरा यासह शहराच्या विविध भागात १२ ते १५ हजार फेरीवाले व्यवसाय करतात. ते लघु उद्योजक (गारमेंट) यांच्याकडून माल घेतला आणि विक्री करतात. फेरीवाल्यांचा व्यवसाय ठप्प असल्याने कपडे व अन्य साहित्याचा पुरवठा करणाऱ्या कुटुंंबांवरही असेच आर्थिक संकट आले आहे. व्यवसायासाठी जमा असलेल्या पुंजीतून कसाबसा दीड महिना काढला. परंतु जवळ होते ते संपले, आता करायचे काय? असा प्रश्न फेरीवाले व गारमेंट व्यवसायिकांना पडला आहे. २१ मार्च पासून राज्य सरकारने व त्यानंतर २५ मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊ न लागू केले. त्यानंतर देशात पुन्हा ३ मेपर्यंत लॉकडाऊ न वाढविण्यात आले आहे. नागपूर शहरात जवळपास १५ हजार फेरीवाले असून त्यांना साहित्य पुरवणारे तीन ते चार हजार कुटुंबे लघु युनिट चालवून मालाचा पुरवठा करतात. व्यवसाय ठप्प असल्याने १८ हजार कु टुंबांपुढे आर्थिक संकट उभे ठाकल्याची माहिती फेरीवाला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. फेरीवाले व त्यांना माल पुरविणाऱ्यांची दररोज ४ ते ५ कोटींची उलाढाल होते. हातावरची कमाई असल्याने उदरनिर्वाहाचे हेच त्यांचे साधन आहे. या व्यावसायिकांंना वेळीच मदत मिळाली नाही तर ते गंभीर संकटातून बाहेर पडणार नाहीत.
गारमेंट व्यवसाय सावरण्याला सहा महिने लागतील
फेरीवाल्यांचा व्यवसाय ठप्प असल्याने गारमेंट व्यवसायही ठप्प आहे. अनेकांना कर्जाचे हप्ते फेडण्याची चिंता लागली आहे. लॉकडाऊन संपल्यानंतरही यातून सावरण्यासाठी गारमेंट व्यवसायाला किमान सहा महिने लागतील, अशी माहिती गारमेंट व्यावसायिकांनी दिली.

संघटनेकडून प्रत्येकी दोन हजारांची मदत
व्यवसाय दीड महिन्यापासून ठप्प असल्याने फेरवाल्यांपुढे उदरनिर्वाहाची गंभीर समस्या उभी ठाकली आहे. याचा विचार करता नागपूर फेरीवाला संघटेच्या माध्यमातून फेरीवाल्यांना प्रत्येकी दोन हजारांची आर्थिक मदत केली जात असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष रज्जाक कुरैशी यांनी दिली. यासाठी संघटनेचे पदाधिकारी गोपी अंभोरे, शेख शाहिद, संदीप साहू, राजू मिश्रा, कालू मिश्रा आदींनी पुढाकार घेतला आहे. आर्थिक संकटातील फेरीवाल्यांना शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी कुरैशी यांनी केली आहे.

Web Title: Starving distress before 15,000 Street Vendors in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.