देशातील तरुणाईला ड्रग्जच्या नशेत गुंगवून ठेवायचं भाजपच षड्यंत्र : अतुल लोंढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2021 12:21 PM2021-11-02T12:21:22+5:302021-11-02T13:24:56+5:30

जेव्हा यांची पंजाबमध्ये सत्ता होती तेव्हा पंजाबचा त्यांनी उडता पंजाब करुन टाकला. आता केंद्रात त्यांची सत्ता आहे. तर, भारताच कायं उडता भारत करणार आहात का? अशी घणाघाती टीका प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली.

state congress committee spokesperson atul londhe on bjp over mumbai cruise drugs case | देशातील तरुणाईला ड्रग्जच्या नशेत गुंगवून ठेवायचं भाजपच षड्यंत्र : अतुल लोंढे

देशातील तरुणाईला ड्रग्जच्या नशेत गुंगवून ठेवायचं भाजपच षड्यंत्र : अतुल लोंढे

googlenewsNext

नागपूर : केंद्रातील सत्तेच्या अधिकाराखाली देशात प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरित्या ड्रग्जचा वापर मोठ्या प्रमाणात चालला असून देशाला ड्रग्जच्या नशेत गुंगवून ठेवायचं भाजपच षड्यंत्रच, असल्याचा खळबळजनक आरोप प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे. ते नागपुरात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार टीका केली. तसेच, गुजरात येथील मुंद्रा ड्रग्ज प्रकरणावरुनही त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. मुंबईत क्रुझ पार्टी प्रकरण, मुंद्रा पोर्टवर सापडलेले कोट्यवधींचे ड्रग्ज याला प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या हे सरकार जबाबदार आहे. जेव्हा यांची पंजाबमध्ये सत्ता होती तेव्हा पंजाबचा त्यांनी उडता पंजाब करुन टाकला. आता केंद्रात त्यांची सत्ता आहे. तर, भारताच कायं उडता भारत करणार आहात का? अशीही घणाघाती टीका लोंढेंनी केली.

या सगळ्या प्रकरणात एक इनोव्हा गाडी आहे. ती गाडी रवींद्र कदम याच्या नावावर आढळली असून त्याचा पत्ता कराडचा आहे. ती गाडी गुजरातला गेली होती, तीच गाडी एनसीबी ऑफिसला होती. ही गाडी तिथे कशी गेली. याचा शोध घेतला पाहिजे. आम्ही त्या गाडीचा शोध घेतला असता ती गाडी ज्याच्या नावावर रजिस्टर आहे. त्या अनुषगांने आम्हाला कराडचा पत्ता मिळाला पण त्या पत्त्यावर रविंद्र कदम राहत नाही, असंही लोंढे म्हणाले.

या देशात मोठ्या प्रमाणा ड्रग्ज आले आणि हे ड्रग्ज लपवण्यासाठी हिंदु- मुस्लीम असा घाट घालून लक्ष वळवण्याचा प्रयत्न केला गेला. मुंद्रापासून तर एनसीबीपर्यंतच्या सर्व तार जुळलेल्या आहेत. समीर वानखेडे आणि रविंद्र कदम, सुनिल पाटील, गोसावी, भानुशाली यांच्यावर कारवाई करून त्यांना अटक केल्यानंतर हे सगळं समोर येईल, असेही लोंढे म्हणाले.

Web Title: state congress committee spokesperson atul londhe on bjp over mumbai cruise drugs case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.