२१ बार संचालकांवर स्टेट एक्साईजची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:08 AM2021-04-24T04:08:58+5:302021-04-24T04:08:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेत प्रशासनाने घालून दिलेल्या अटी, शर्थींचे उल्लंघन करणाऱ्या २१ बार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेत प्रशासनाने घालून दिलेल्या अटी, शर्थींचे उल्लंघन करणाऱ्या २१ बार संचालकांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने (स्टेट एक्साईज) कारवाई केली.
कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेत बीअर बारला प्रशासनाने वेगवेगळे नियम आणि अटी घालून दिल्या आहेत. १ ते २१ एप्रिल दरम्यान त्याचे उल्लंघन करणाऱ्या २१ बार संचालकांवर स्टेट एक्साईजच्या पथकाने कारवाई केली. त्यात श्रुती बार (स्वावलंबीनगर), ड्यूक्स बार (भीलगाव), मयूरी सावजी बार (राणी दुर्गावती चौक), चंद्रहास बार (जुनी मंगळवारी), हिररांझा बार (इतवारी), राजमोहन बार (जरीपटका), ब्रह्मा बार (मानेवाडा), ग्रीन बार (मानेवाडा), मौर्य बार (बोकारा), न्यू अशोका बार (मौदा), सनराईज बार (दहेगाव रंगारी), स्मृती बार (उमरेड, वायगाव घोटूरली), भूमी बार (उमरेड), निसर्ग बार (उमरेड), चांदनी बार (ताजबाग), पूनम बार (पांचगाव), फौजी बार (कन्हान), मोरिया बार (पारडी), रोहित बार (वाडी), सत्कार बार (वाडी) आणि राजश्री बार (कळमेश्वर) यांचा समावेश आहे. एक्साईज एसपी प्रमोद सोनोने यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक सुभाष खरे, दुय्यम निरीक्षक अशोक शितोळे, जितेंद्र पाटील, राम सेंगर, प्रवीण मोहतकर, नरेंद्र बोलधने, मुकुंद चिटमटवार आणि बाळू भगत यांनी ही कारवाई केली.
---
मद्य तस्करी करणारांना अटक
याच पथकाने गुरुवारी आणि शुक्रवारी अंबाझरी, इमामवाडा, पाचपावली तसेच केळवद भागात मद्य तस्करी करणाऱ्या १४ जणांना पकडले. त्यांच्याकडून ६०० लीटर मोहाची दारू तसेच ६ वाहने असा एकूण ४ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
----