राज्य सरकारचे नागपूर जिल्ह्याला रस्ता अनुदानासाठी ७.८५ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 09:24 PM2018-02-03T21:24:25+5:302018-02-03T21:29:19+5:30

राज्यातील महानगरपालिका, नगर परिषदा व नगर पंचायतींना शासनातर्फे सर्वसाधारण रस्ता अनुदान देण्यात येते. नागपूर महानगरपालिका आणि जिल्ह्यातील सर्व नगर परिषदा आणि पंचायतींना शासनाने एकूण ७ कोटी ८५ लक्ष रुपयांचा निधी दिला असून हा निधी जिल्हाधिका ऱ्यांच्या सुपूर्द करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच एवढा निधी उपराजधानीला उपलब्ध झाला आहे.

State government assisted 7.85 crore for road to the Nagpur district | राज्य सरकारचे नागपूर जिल्ह्याला रस्ता अनुदानासाठी ७.८५ कोटी

राज्य सरकारचे नागपूर जिल्ह्याला रस्ता अनुदानासाठी ७.८५ कोटी

Next
ठळक मुद्देमनपाला दीड कोटी : नगर परिषदेला ६ कोटी ३५ लाख

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यातील महानगरपालिका, नगर परिषदा व नगर पंचायतींना शासनातर्फे सर्वसाधारण रस्ता अनुदान देण्यात येते. नागपूर महानगरपालिका आणि जिल्ह्यातील सर्व नगर परिषदा आणि पंचायतींना शासनाने एकूण ७ कोटी ८५ लक्ष रुपयांचा निधी दिला असून हा निधी जिल्हाधिका ऱ्यांच्या सुपूर्द करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच एवढा निधी उपराजधानीला उपलब्ध झाला आहे.
या संदर्भातील शासकीय परिपत्रक गेल्या २५ जानेवारी रोजी नगर विकास विभागाने जारी केले आहे. राज्यातील संपूर्ण मनपा आणि नगर परिषदा व पंचायतींना एकूण १४९ कोटी १० लक्ष रुपयांचा निधी देण्यात आला आहे. या प्रकल्पातून करण्यात येणारी रस्त्याची कामे सार्वजनिक स्वरूपाची असतील. यामुळे नागरिकांच्या प्राथमिक सोयी सुविधांमध्ये भर पडणार आहे. सर्व कामे शहर विकास नियंत्रण नियमावली व विकास आराखड्याशी सुसंगत असली पाहिजेत. या कामांसाठी ई-निविदा कार्यप्रणालीचाच अवलंब करावा लागणार आहे.
नागपूर महापालिकेला सर्वसाधारण रस्ता अनुदानासाठी दीड कोटी रुपये देण्यात आले असून कामठी, उमरेड, काटोल, वाडी या नगर परिषदांना प्रत्येकी ५० लाख तर रामटेक, खापा, कळमेश्वर, मोवाड, सावनेर, नरखेड, मोहपा, कन्हान पिंपरी व वानाडोंगरी नगर परिषदेला प्रत्येकी ३५ लाख रुपये देण्यात आले आहे. मौदा, महादुला, कुही, हिंगणा, भिवापूर व पारशिवनी या नगरपंचायतींना प्रत्येकी २० लाख रुपये अनुदान देण्यात आले आहे.

Web Title: State government assisted 7.85 crore for road to the Nagpur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.