राज्य सरकारने केले पोलीस विभागाचे खच्चीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:08 AM2021-09-13T04:08:20+5:302021-09-13T04:08:20+5:30

नागपूर : साकीनाका येथील घटनेची पुनरावृत्ती राज्यात होऊ नये, यासाठी राज्य सरकारने विशेष लक्ष दिले पाहिजे. परंतु राज्य सरकारच्या ...

The state government has embezzled the police department | राज्य सरकारने केले पोलीस विभागाचे खच्चीकरण

राज्य सरकारने केले पोलीस विभागाचे खच्चीकरण

Next

नागपूर : साकीनाका येथील घटनेची पुनरावृत्ती राज्यात होऊ नये, यासाठी राज्य सरकारने विशेष लक्ष दिले पाहिजे. परंतु राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे राज्यातील पोलीस खाते बदनाम झाले असून पोलीस विभागाचे खच्चीकरण करण्यात आले असल्याचा आरोप भाजपचे आ. कृष्णा खोपडे यांनी लावला.

माजी गृहमंत्र्यांवरील आरोप, विविध प्रकरणांत राज्य शासनाचा थेट हस्तक्षेप यामुळे राज्यातील पोलिसांचा वचक कमी झाला व गुंडांचा हैदोस वाढू लागला आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी कुठल्याही सरकारचे पद नसतानादेखील मोठमोठ्या गुन्हेगारांना सळो की पळो करून सोडले होते. मात्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असूनदेखील राज्यात गुन्हेगारीला पोषक वातावरण निर्माण होत आहे. जे बाळासाहेबांना जमले ते मुख्यमंत्र्यांना काम जमत नाही, असा सवाल खोपडे यांनी केला.

Web Title: The state government has embezzled the police department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.