शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी राज्य सरकार गंभीरपणे विचार करत आहे- कृषीमंत्री अब्दुल सत्तार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2022 03:51 PM2022-09-11T15:51:00+5:302022-09-11T15:55:48+5:30
राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज नागपुरातील वनामती येथे सुरू असलेल्या ऍग्रोविजन या कार्यक्रमात उपस्थिती लावली.
नागपूर- राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज नागपुरातील वनामती येथे सुरू असलेल्या ऍग्रोविजन या कार्यक्रमात उपस्थिती लावली. या कार्यक्रमात त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, राज्य सरकारने एवढा मोठा निधी शेतकऱ्यांच्यासाठी दिला आहे व अजूनही पंचनामे करणे सुरूच आहे, असं अब्दुल सत्तार यांनी सांगितलं.
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी राज्यसरकार गंभीरपणे विचार करत आहे. त्यासाठी आम्ही एक दिवस शेतकऱ्यांसोबत राहणार आहे आणि शेतकऱ्यांना काय समस्या येतात आणि ते का आत्महत्या सारखी टोकाची भूमिका घेतात, त्यावर काय उपयोजना करता येईल, याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करु, असं कृषीमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.
शेतकरी संकटात सापडल्यानंतर त्याला मदत करण्यामध्ये कुठेही फार जाचक अटी टाकु नये. त्यांना मदत करावी असा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे, अशी माहितीही अब्दुल सत्तार यांनी दिली.