राज्य शासनाकडून शरजिल उस्मानीला वाचविण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:09 AM2021-03-18T04:09:34+5:302021-03-18T04:09:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सामाजिक द्वेष निर्माण होईल, असे वक्तव्य देणाऱ्या शरजिल उस्मानीला राज्य शासन पाठीशी घालण्याचा प्रयत्न ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सामाजिक द्वेष निर्माण होईल, असे वक्तव्य देणाऱ्या शरजिल उस्मानीला राज्य शासन पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत आहे. पोलीस विभागाकडूनदेखील साथ देण्यात येत आहे, असा आरोप भारतीय जनता युवा मोर्चातर्फे करण्यात आला. या मुद्द्यावर शहरातील सहाही मंडळांत सांकेतिक आंदोलने करण्यात आली.
भाजयुमोने पाठपुरावा केल्यानंतर पुण्यात उस्मानीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, त्याच्याविरुद्ध केवळ १५३ (अ) हे कलम लावण्यात आले. धार्मिक तेढ निर्माण करण्याबाबतचे कलम लावण्यात आले नाही. महाविकास आघाडी शरजिल उस्मानीलासुद्धा पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप भाजयुमोचे शहराध्यक्ष पारेंद्र पटले यांनी केला. आंदोलनात प्रदेश सचिव राहुल खंगार, कल्याण देशपांडे, सदस्य रीतेश रहाटे, यश सातपुते, अमर धरमारे, सन्नी राऊत, बादल राऊत, शेखर कुर्यवंशी, पंकज सोनकर प्रामुख्याने उपस्थित होते.