रेड्डी व शिवकुमार यांच्या आर्थिक चौकशीसाठी बेलदार समाजाचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:07 AM2021-03-31T04:07:59+5:302021-03-31T04:07:59+5:30

नागपूर : हरिसालच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणी उपवनसंरक्षक शिवकुमार आणि क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्टी यांना नोकरीतून ...

Statement of Beldar Samaj for financial inquiry of Reddy and Shivkumar | रेड्डी व शिवकुमार यांच्या आर्थिक चौकशीसाठी बेलदार समाजाचे निवेदन

रेड्डी व शिवकुमार यांच्या आर्थिक चौकशीसाठी बेलदार समाजाचे निवेदन

Next

नागपूर : हरिसालच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणी उपवनसंरक्षक शिवकुमार आणि क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्टी यांना नोकरीतून बरखास्त करण्यात यावे आणि त्यांची आर्थिक चौकशी करण्यात यावी, अशी मागणी बेलदार समाज, कर्मवीर दादासाहेब कन्नमवार प्रचार व प्रसार समितीच्या वतीने प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) साईप्रकाश यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे.

चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणी विविध मागण्यांसह बेलदार समाज व कन्नमवार प्रचार समितीचे पदाधिकारी राजेंद्र बढिये, मुकुंद अडेवार, अर्चना कोट्टेवार, विनोद आकुलवार यांनी साईप्रकाश यांच्याशी चर्चा करून ही मागणी केली. या अधिकाऱ्यांचे केवळ निलंबन न करता नोकरीतून बरखास्त केले जावे, तसेच या दोन्ही अधिकाऱ्यांची आर्थिक चौकशी केले जावी, या आशयाचे निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनाही संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.

Web Title: Statement of Beldar Samaj for financial inquiry of Reddy and Shivkumar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.