दयाशंकरसिंग यांचा पुतळा जाळला

By admin | Published: July 22, 2016 02:50 AM2016-07-22T02:50:16+5:302016-07-22T02:50:16+5:30

अध्यक्ष मायावती यांच्या विरुद्ध भाजपाचे उत्तर प्रदेश उपाध्यक्ष दयाशंकरसिंग यांनी केलेल्या वक्तव्याचे तीव्र पडसाद देशभरात उमटले आहे.

The statue of Dayashankar Singh was burnt | दयाशंकरसिंग यांचा पुतळा जाळला

दयाशंकरसिंग यांचा पुतळा जाळला

Next

बसपा कार्यकर्ते आक्रमक : मायावतींच्या विरोधातील वक्तव्याचा निषेध
नागपूर : अध्यक्ष मायावती यांच्या विरुद्ध भाजपाचे उत्तर प्रदेश उपाध्यक्ष दयाशंकरसिंग यांनी केलेल्या वक्तव्याचे तीव्र पडसाद देशभरात उमटले आहे. नागपुरातही बसपाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल करीत निदर्शने केली. दयाशंकरसिंग यांच्या पुतळ्याचे प्रतिकात्मक दहन करून आपला रोष व्यक्त केला. यनंतर राष्ट्रपती व प्रधानमंत्री यांना निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत निवेदन सादर केले.
भाजपचे उत्तर प्रदेशचे दयाशंकरसिंग यांनी मंगळवारी एका पत्रकार परिषदेत बोलतांना बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा व राज्यसभेच्या खासदार मायावती यांच्याबद्दल बोलताना अभद्र भाषेचा वापर केला. त्यामुळे बसपा कार्यकर्त्यांंमध्ये प्रचंड संताप आहे. गुरुवारी दुपारी बसपाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठ्या संख्येने धडक देऊन निषेध व्यक्त केला. यावेळी केंद्र सरकार, भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधातही नारेबाजी करण्यात आली. दरम्यान दयाशंकरसिंग यांच्या पुतळ्याचे दहनसुद्धा करण्यात आले. मायावतींच्या विरुद्ध ज्या भाषेत बोलले गेले तो केवळ एका व्यक्तीचा अपमान नसून संपूर्ण महिलांचा अपमान आहे. त्यामुळे आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करतो. दयाशंकरसिंग यांच्याविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून लवकरात लवकर तुरुंगात डांबण्यात यावे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी नैतिकतेच्या आधारे सिंग यांना भाजपमधून ताबडतोब निलंबित करावे, अशी मागणी यावेळी करण्यात अली. असे न झाल्यास बहुजन समाज पार्टी संपूर्ण राज्यात रस्त्यावर येऊन तीव्र आंदोलन करत राहील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
याशिवाय देशभरात दलितांवर सुरू असलेल्या अत्याचाराचा आणि मुंबईतील आंबेडकर भवन पाडल्याचा निषेध सुद्धा यावेळी करण्यात आला.
आंदोलनात राज्याचे प्रभारी प्रेम रोडेकर,महासचिव जितेंद्र मैसकर, प्रदेश सचिव सागर डबरासे,उत्तम शेवडे, नाना देवगडे, राजू बसवनाथे, जिल्हाध्यक्ष नागोराव जयकर, राजकुमार बोरकर, मोहन राईकवार, त्र्यंबक घरडे, पृथ्वीराज शेंडे, विवेक हाडके, रुपेश बागेश्वर, मिलिंद बसोड, गौतम पाटील, संजय जैस्वाल, महेश साहारे, चंद्रशेखर कांबळे, कविता लांडगे, आनंद सोमकुवर, अभिषेक शंभरकर, मुरली मेश्राम यांच्यासह विदर्भातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.(प्रतिनिधी)

 

Web Title: The statue of Dayashankar Singh was burnt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.