संत तुलसीदास यांच्या पुतळ्याचा परिसर केला कचरामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:08 AM2021-01-18T04:08:57+5:302021-01-18T04:08:57+5:30
नागपूर : नागपूर सिटीझन फाेरमच्या कार्यकर्त्यांनी शहरातील पुतळे व वारसास्थळांची स्वच्छता करण्याचे अभियान राबविले असून दर रविवारी श्रमदान ...
नागपूर : नागपूर सिटीझन फाेरमच्या कार्यकर्त्यांनी शहरातील पुतळे व वारसास्थळांची स्वच्छता करण्याचे अभियान राबविले असून दर रविवारी श्रमदान करून ही स्थळे स्वच्छ केली जात आहेत. या रविवारी सर्व सदस्यांनी श्रमदान करून मानस चाैकातील संत तुलसीदास यांचा पुतळा स्वच्छ करून येथील परिसर कचरामुक्त केला.
मानस चौकातील संत श्री तुलसीदास महाराज यांच्या पुतळ्यावर मोठ्या प्रमाणात धूळ साचली होती. पुतळ्याच्या चबुतऱ्यावर गवत उगवले होते. व सुशोभीकरणासाठी लावलेली समई तुटली होती. फोरमच्या सदस्यांनी तब्बल तासभर श्रमदान करत या पुतळ्याचे रुप पालटले. यावेळी पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी अभिजित सिंह चंदेल, प्रतीक बैरागी, अमित बांदूरकर, अभिजित झा, वैभव शिंदे पाटील, गजेंद्र सिंग लोहिया, राहुल लोणारे, प्रवीण चोपडे, स्वप्निल पोहाणे, शिवा लाडकर, प्रतीक ढोक, संकेत महाले,अमोल माने, राहुल बैरागी व गोपाल सिंह आदी सदस्य उपस्थित होते.
१९८७ साली तत्कालीन महापौर पांडुरंग हिवरकर यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण झाले होते. या पुतळ्याच्या देखभाल दुरुस्तीची संपूर्ण जवाबदारी ही नागपूर महानगरपालिकेची आहे. मात्र प्रशासन व पदाधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे शहरातील अनेक पुतळ्यांप्रमाणे हा पुतळादेखील धूळखात पडला आहे. पुतळ्यांच्या नियमित स्वच्छतेसाठी मनपाने तत्परता दाखवण्याची गरज आहे. महापौर व आयुक्त जोपर्यंत पुतळ्यांच्या स्वच्छतेचा विषय गांभीर्याने घेणार नाहीत तोपर्यंत सिटिझन्स फोरम हा विषय लावून धरेल असे फोरमचे सदस्य प्रतीक बैरागी यांनी म्हटले आहे.