सरकारी पैशांतून पुतळे उभारूच नयेत : नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 06:45 AM2023-06-19T06:45:06+5:302023-06-19T06:45:16+5:30

‘फुकट मिळालेल्या गोष्टींचे महत्त्व नसते’

Statues should not be erected with government money: Nitin Gadkari | सरकारी पैशांतून पुतळे उभारूच नयेत : नितीन गडकरी

सरकारी पैशांतून पुतळे उभारूच नयेत : नितीन गडकरी

googlenewsNext

नागपूर :  ज्ञानाच्या मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा होत असल्याने नवीन पिढीला निश्चितच प्रेरणा मिळेल. हा पुतळा लोकसहभागातून तयार होणार असल्याची बाब कौतुकास्पद आहे. सरकारी पैशांतून पुतळे उभारूच नयेत, असे माझे मत आहे. लोकांना फुकट मिळालेल्या गोष्टींचे महत्त्व नसते. आर्थिक योगदान दिले तरच लोकांना महत्त्व कळते, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केले. 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनारूढ पुतळ्याची उभारणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या महाराजबाग चौक परिसरातील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये होणार आहे. या भूमिपूजनानंतर आयोजित कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. तत्पूर्वी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भूमिपूजन करण्यात आले. 

Web Title: Statues should not be erected with government money: Nitin Gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.