नागपूर विभागातील स्थिती : डिझेलअभावी दुसऱ्या दिवशीही एसटीच्या फेऱ्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 11:13 PM2019-12-27T23:13:59+5:302019-12-27T23:15:39+5:30

डिझेल भरण्यासाठी पैसे नसल्यामुळे एसटी बसेस रद्द झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित करताच एसटी महामंडळाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यात खळबळ उडाली. दरम्यान शुक्रवारी दुपारपर्यंत डिझेल नसल्यामुळे एसटी महामंडळाच्या विविध आगारात हजारो किलोमीटरच्या फेऱ्या रद्द कराव्या लागल्या.

Status of Nagpur region: ST rounds canceled for next day due to lack of diesel | नागपूर विभागातील स्थिती : डिझेलअभावी दुसऱ्या दिवशीही एसटीच्या फेऱ्या रद्द

नागपूर विभागातील स्थिती : डिझेलअभावी दुसऱ्या दिवशीही एसटीच्या फेऱ्या रद्द

googlenewsNext
ठळक मुद्दे‘लोकमत’च्या वृत्ताने खळबळ

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : डिझेल भरण्यासाठी पैसे नसल्यामुळे एसटी बसेस रद्द झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित करताच एसटी महामंडळाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यात खळबळ उडाली. दरम्यान शुक्रवारी दुपारपर्यंत डिझेल नसल्यामुळे एसटी महामंडळाच्या विविध आगारात हजारो किलोमीटरच्या फेऱ्या रद्द कराव्या लागल्या.
गुरुवारी डिझेलचा तुटवडा असल्यामुळे एसटी महामंडळाच्या नागपूर विभागात अनेक फेऱ्या रद्द कराव्या लागल्या होत्या. आजही हीच परिस्थिती पाहावयास मिळाली. इमामवाडा आगारात डिझेल नसल्यामुळे आकोट, अमरावती, आदिलाबाद अशा १० बसेस रद्द कराव्या लागल्या. इमामवाडा आगारात सायंकाळपर्यंत डिझेल उपलब्ध झाले नव्हते तर मध्यवर्ती गणेशपेठ आगारात डिझेल नसल्यामुळे ४ हजार किलोमीटरच्या १५ फेऱ्या रद्द करण्याची नामुष्की एसटी महामंडळावर आली. दुपारी १ वाजता गणेशपेठ आगारात डिझेलचे टँकर आल्यानंतर तेथील वाहतूक सुरळीत झाली. घाट रोड आगारातही १५ फेºया रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. वर्धमाननगर आगारातही डिझेलच्या तुटवड्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाल्याची माहिती आहे. डिझेल नसल्यामुळे बसेस रद्द करण्यात आल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. त्यांना आल्यापावली परत जाण्याची वेळ आली. यामुळेअनेक प्रवाशांनी रोष व्यक्त केला आहे. याबाबत एसटीच्या नागपूर विभागाच्या विभागीय वाहतूक अधिकारी तनुजा काळमेघ यांनी डिझेलचे ऑनलाईन पेमेंट करताना व्यत्त्यय आल्यामुळे डिझेलचे टँकर उशिराने पोहोचल्याची माहिती दिली.
चालकांवर ओरडत आहेत प्रवासी
डिझेलचा तुटवडा असल्यामुळे एसटीच्या चालकांवर प्रवासी आपला राग काढत आहेत. घाट रोड आगाराची बस नागपूरवरून वरुडला गेली. तेथे डिझेल कमी असल्यामुळे ही बस वरुड आगारात नेण्यात आली. परंतु या आगारात डिझेल देण्यासाठी तेथील अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केली. या बसमध्ये प्रवासी बसून असल्यामुळे ते संतापले. तासभरानंतर डिझेल मिळाल्यावर ही बस नागपूरकडे रवाना झाली. डिझेल नसल्यामुळे बस उभ्या होत असून प्रवासी चालकांवर रोष व्यक्त करीत असल्याची माहिती एसटीच्या चालकांनी दिली.

Web Title: Status of Nagpur region: ST rounds canceled for next day due to lack of diesel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.