शारीरिक, मानसिक, सामाजिक स्तरावर अ‍ॅक्टीव्ह रहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 01:26 AM2017-09-25T01:26:35+5:302017-09-25T01:26:49+5:30

वयोमान वाढले आहे. आज व्यक्ती ७० आणि त्याहून जास्त वर्षे जगत आहे. यामुळे शरीरातील महत्त्वाचा अवयव मेंदूच्या आरोग्याची जबाबदारी वाढली आहे.

 Stay active on physical, mental and social level | शारीरिक, मानसिक, सामाजिक स्तरावर अ‍ॅक्टीव्ह रहा

शारीरिक, मानसिक, सामाजिक स्तरावर अ‍ॅक्टीव्ह रहा

Next
ठळक मुद्देशैलेश पानगावकर यांचे आवाहन : जागतिक अल्झायमर दिन साजरा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वयोमान वाढले आहे. आज व्यक्ती ७० आणि त्याहून जास्त वर्षे जगत आहे. यामुळे शरीरातील महत्त्वाचा अवयव मेंदूच्या आरोग्याची जबाबदारी वाढली आहे. ‘अल्झायमर’ला दूर ठेवायचे असेल तर शारीरिक, मानसिक व सामाजिक स्तरावर ‘अ‍ॅक्टीव्ह’ राहायला हवे. योग्य आहार व नियमित व्यायामाकडे लक्ष द्यायला हवे, असे आवाहन मानसिक रोग तज्ज्ञ डॉ. शैलेश पानगावकर यांनी येथे केले.
सायकॅट्रीक सोसायटी नागपूरच्यावतीने रविवारी शंकरनगर येथील साई सभागृहात जागतिक अल्झायमर दिवस साजरा करण्यात आला. ‘वृद्धावस्थेतील समस्या’ या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. डॉ. पानगावकर म्हणाले, अल्झायमर डिमेन्शिया हा मेंदूशी संबंधित आजार आहे. या आजारात रुग्णाची स्मरणशक्ती, विचार क्षमता, वागण्याची पद्धत, आकलन, व्यक्तिमत्त्व आणि आजूबाजूच्या परिसरातील माहिती जाणून घेण्याची क्षमता लोप पावत जाते. त्यामुळे जेवण, गाडी चालवणे, कॉम्प्युटरवर काम करण्यासारख्या साध्या गोष्टीही जमत नाहीत. या सर्व कामासाठी आवश्यक असलेल्या मेंदूतील पेशी (न्यूरॉन्स) हळूहळू लोप पावतात. त्यामुळे मेंदू आकुंचन पावतो. या आजाराची लक्षणे दिसण्याआधी बºयाच वर्षांपासून या पेशी काम करेनाशा झालेल्या असतात. मात्र महत्त्वाच्या कामासाठीच्या भागातील पेशींमध्ये लक्षणीय कपात झाल्यावरच लक्षणे दिसू लागतात. या आजारावर कोणताही उपाय नाही. आजार पहिल्या टप्प्यात असताना औषधांनी आजाराचा वेग कमी करता येतो. औषधांशिवाय कुटुंबीयांचा सहभाग महत्त्वाचा ठरतो, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमात डॉ. नेहा सालनकर, डॉ. दीपिका सिंग, अ‍ॅड. करण सचदेवा, डॉ. रेणुका मार्इंदे यांनीही आपले विचार मांडले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पवन अडतिया, डॉ. सागर चिद्दरवार, प्रादेशिक मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रवीण नवखरे यांनी परिश्रम घेतले.
डॉ. पानगावकर म्हणाले, अयोग्य जीवनशैलीमुळे पन्नाशीत अल्झायमर वाढत आहे. हे वय धावपळीचे असल्याने स्वत:कडे दुर्लक्ष होते. विशेषत: ज्यांना मधुमेह व उच्चरक्तदाब आहे त्यांचे यावर नियंत्रण राहत नाही. औषध नियमित घेत नाही, व्यायाम करीत नाही, सतत तणावात राहत असल्याने मेंदूच्या पेशी नष्ट होतात. यामुळे योग्य जीवनशैली आत्मसात करणे अतिशय महत्त्वाचे आहे.
रोखथाम महत्त्वाची
डॉ. पानगांवकर म्हणाले, अल्झायमरवर कोणताही प्रतिबंधात्मक उपाय सापडलेला नाही. मात्र निरोगी राहणे, नियमित व्यायाम, मेंदूला चालना देणारे प्रकार, योग्य आहार, यामुळे अल्झायमर आजार पुढे ढकलला जाऊ शकतो. अल्झायमरविषयी जनजागृती केल्यास या आजाराचे लवकर निदान होऊन रुग्णाला अधिक योग्य आयुष्य जगण्यासाठी मदत होऊ शकते.
योग्य आहार घ्या
भारतीय आहार उत्कृष्ट आहे. परंतु वयासोबत दात गळून पडत असल्याने चावून खाण्याचे पदार्थ या वयात कमी पडतात. यामुळे या वयात आहाराकडे विशेष लक्ष देणे महत्त्वाचे ठरते. विशेषत: उकडलेल्या भाज्या, व्हिटॅमिनयुक्त आहार घेणे आवश्यक आहे. योग्य आहारासोबतच कोवळं उन्ह अंगावर पडू द्या, असेही डॉ. पानगांवकर म्हणाले,
 

Web Title:  Stay active on physical, mental and social level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.