पालकमंत्र्यांचा गावात दोन दिवस मुक्काम

By admin | Published: July 24, 2016 02:02 AM2016-07-24T02:02:21+5:302016-07-24T02:02:21+5:30

ग्रामीण भागात स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी पालकमंत्री दोन दिवस जिल्ह्यातील एका गावात मुक्काम करून गावातील सोयीसुविधांचा आढावा घेतील.

Stay in the Guardian's Village for two days | पालकमंत्र्यांचा गावात दोन दिवस मुक्काम

पालकमंत्र्यांचा गावात दोन दिवस मुक्काम

Next

सोयीसुविधांचा घेणार आढावा : स्वच्छता मोहिमेला देणार गती
नागपूर : ग्रामीण भागात स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी पालकमंत्री दोन दिवस जिल्ह्यातील एका गावात मुक्काम करून गावातील सोयीसुविधांचा आढावा घेतील. तेव्हा प्रत्येक अधिकाऱ्याने एक दिवस गावात राहावे, असे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वत: शनिवारी बैठकीत स्पष्ट केले.
रविभवन येथे शनिवारी आरोग्यासंबंधीची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. स्वच्छता मोहिमेबाबत केंद्र व राज्य सरकार अतिशय गंभीर आहे. त्यादृष्टीने ग्रामीण भागामध्ये स्वच्छता मोहिमेला गती मिळावी यासाठी पालकमंत्र्यांनी स्वत: पुढाकार घेत दोन दिवस गावात राहण्याचा निर्णय घेतला आहे. स्वत: पालकमंत्री दोन दिवस गावात मुक्कामास राहणार असतील तर त्या गावातील स्वच्छतेसोबतच इतर समस्याही मार्गी लागण्याची शक्यता बळावली आहे.

 

Web Title: Stay in the Guardian's Village for two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.