दोन दिवस घरीच राहा, कोरोनाला हद्दपार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 11:14 AM2021-02-26T11:14:31+5:302021-02-26T11:15:38+5:30

Nagpur News कोरोनाला हद्दपार करण्यासाठी शनिवार आणि रविवार दोन्ही दिवस घरीच राहा. प्रतिष्ठाने, कार्यालये, दुकाने उत्स्फूर्तपणे बंद ठेवा. आवश्यक असले तरच घराबाहेर पडा असे आवाहन महापालिकेने केले आहे.

Stay home for two days, banish Corona | दोन दिवस घरीच राहा, कोरोनाला हद्दपार करा

दोन दिवस घरीच राहा, कोरोनाला हद्दपार करा

Next
ठळक मुद्देप्रतिष्ठाने बंद ठेवा, कार्यालयेही बंद राहणारमहापौर, आयुक्तांचे आवाहन

 लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने कडक निर्बंध घातले आहेत. निर्बंध कडक असले तरी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हितकारक आहेत. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी शनिवार आणि रविवार दोन्ही दिवस घरीच राहा. प्रतिष्ठाने, कार्यालये, दुकाने उत्स्फूर्तपणे बंद ठेवा. आवश्यक असले तरच घराबाहेर पडा असे आवाहन महापालिकेने केले आहे.

महापालिकेच्या अधिकृत सोशल मीडियावरून महापौर दयाशंकर तिवारी आणि मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. नागरिकांना नियम पाळण्याचे आणि कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी स्वयंस्फूर्तीने प्रशासनाने घातलेले निर्बंध पाळून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. एक कोरोनाबाधित व्यक्ती गर्दीत गेला तर २५ व्यक्तींना त्याचा संसर्ग होऊ शकतो. अर्थात आपल्यामुळे इतरांचे आरोग्य धोक्यात टाकणे योग्य नाही. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंग हे नियम पाळावेत. वेळोवेळी प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करावे. आवश्यक सेवा सुरू राहतील. घरी राहून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महापौरांनी केले आहे.

नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रित असावी यासाठी मनपा प्रशासन कठोर पावले उचलत आहे. उपद्रव शोध पथक दिवसरात्र नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करीत आहे. मात्र, कारवाई हा त्यावरील उपाय नाही. नियम पाळणे आणि संसर्ग टाळणे अत्यावश्यक आहे. यासाठी काही नियम कडक केले आहेत. शनिवार आणि रविवारी कुणीही घराबाहेर पडू नका असे आवाहन राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.

कुटुंबासोबत दोन दिवस घालवा

शनिवार व रविवार दुकाने, मॉल, बाजार, थिएटर, नाट्यगृह, उपाहारगृह, हॉटेल, रेस्टॉरेंट, सरकारी, निमशासकीय, खासगी कार्यालये, मनपाचे कत्तलखाने, शहरातील मांस विक्रीची दुकाने सुरू राहणार नाहीत. नागरिकांनीही अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये. मात्र अत्यावश्यक सेवा सुरू राहील. कुटुंबासोबत दोन दिवस घालवावेत आणि कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

Web Title: Stay home for two days, banish Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.