बारमधून विदेशी दारूची चाेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:16 AM2021-09-02T04:16:48+5:302021-09-02T04:16:48+5:30

खापरखेडा : अज्ञात चाेरट्याने बीअर बारमधून राेख रक्कम व विदेशी दारू असा एकूण १८ हजार २५५ रुपये किमतीचा मुद्देमाल ...

Stealing foreign liquor from the bar | बारमधून विदेशी दारूची चाेरी

बारमधून विदेशी दारूची चाेरी

Next

खापरखेडा : अज्ञात चाेरट्याने बीअर बारमधून राेख रक्कम व विदेशी दारू असा एकूण १८ हजार २५५ रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरून नेला. ही घटना खापरखेडा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नांदा शिवारात साेमवारी (दि.३०) पहाटेच्या सुमारास घडली.

विलास उमाशंकर उकाेने (३६, रा. वाॅर्ड क्र. १६, पहलेपार) यांचे नांदा शिवारातील पाईपलाईन राेडवर खापा बीअर बार ॲण्ड रेस्टॉरंट आहे. अज्ञात चाेरट्याने बारचे कुलूप ताेडून आत प्रवेश केला. यात चाेरट्याने बारमधून १६,७५५ रुपये किमतीची विदेशी दारू व राेख १,५०० रुपये असा एकूण १८ हजार २५५ रुपयाचा मुद्देमाल चाेरून नेला. ही बाब लक्षात येताच उकाेने यांनी पाेलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी खापरखेडा पाेलिसांनी भादंवि कलम ४६१, ३८० अन्वये गुन्हा नाेंदविला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पाेलीस हवालदार नावेद खान करीत आहेत.

Web Title: Stealing foreign liquor from the bar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.