स्टीलच्या बेंचमुळे नागपूर रेल्वेस्थानकाच्या सौंदर्यात भर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 09:53 PM2019-09-26T21:53:35+5:302019-09-26T21:54:36+5:30

रेल्वे प्रशासनाने नागपूर रेल्वेस्थानकाच्या सौंदर्यीकरणासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. प्रवाशांच्या सुविधेसाठी आरक्षण कार्यालय, होम प्लॅटफार्म आणि वेटिंग रुममध्ये चकाकणारे स्टीलचे बेंच लावल्यामुळे रेल्वेस्थानकाच्या सौंदर्यात भर पडली आहे.

Steel benches add to the beauty of Nagpur Railway Station | स्टीलच्या बेंचमुळे नागपूर रेल्वेस्थानकाच्या सौंदर्यात भर 

स्टीलच्या बेंचमुळे नागपूर रेल्वेस्थानकाच्या सौंदर्यात भर 

googlenewsNext
ठळक मुद्देप्रवाशांसाठी सुविधा : आरक्षण कार्यालय, वेटिंग रुम, होम प्लॅटफार्मला आकर्षक लूक

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : रेल्वे प्रशासनाने नागपूर रेल्वेस्थानकाच्या सौंदर्यीकरणासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. त्यात आणखी एका सुविधेची भर पडली असून प्रशासनाने प्रवाशांच्या सुविधेसाठी आरक्षण कार्यालय, होम प्लॅटफार्म आणि वेटिंग रुममध्ये चकाकणारे स्टीलचे बेंच लावल्यामुळे रेल्वेस्थानकाच्या सौंदर्यात भर पडली आहे.
रेल्वेस्थानकावर आधी होम प्लॅटफॉर्मवर स्टीलचे रेलिंग लावण्यात आले होते. या स्टीलच्या रेलिंगसारखे दिसणारे स्टीलचे बेंच प्रशासनाने प्लॅटफार्मवर लावले आहेत. त्यामुळे स्टीलच्या रेलिंग आणि बेंचमुळे होम प्लॅटफॉर्मच्या सौंदर्यात आणखीनच भर पडली आहे. नागपूर रेल्वेस्थानकावर २४ तास प्रवाशांची गर्दी पाहावयास मिळते. गर्दीच्या वेळी प्रवाशांना बसण्यासही जागा उरत नसल्यामुळे असंख्य प्रवासी उभे राहतात. तर अनेक प्रवासी खाली बसतात. पावसाळ्यात प्लॅटफॉर्मवर पाणी असल्यामुळे प्रवाशांना खालीही बसता येत नाही. वेटिंग रुम आणि आरक्षण कार्यालयात नेहमीच गर्दी राहते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने आरक्षण कार्यालय आणि वेटिंग रुममध्ये स्टीलचे बेंच लावले आहेत. यात रेल्वेस्थानकाच्या सौंदर्यातही भर पडली असून प्रवाशांनाही बसण्याची सुविधा झाली आहे. आरक्षण कार्यालय, वेटिंग रुम आणि होम प्लॅटफॉर्मवर एकूण ५५ स्टीलचे बेंच बसविण्यात आले आहेत. यापूर्वी रेल्वेस्थानकावर प्रवाशांना बसण्यासाठी लोखंडी, ग्रेनाईटचे बेंच होते. परंतु आता स्टीलचे बेंच लावल्यामुळे प्रवाशांची सुविधा झाली आहे.

Web Title: Steel benches add to the beauty of Nagpur Railway Station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.