काळिमा; सावत्र पित्याची अल्पवयीन बालिकेसोबत छेडछाड; विरोध करणाऱ्या सासूला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2021 22:01 IST2021-11-13T22:00:41+5:302021-11-13T22:01:14+5:30
Nagpur News पाचपावली परिसरात एका सावत्र वडिलानेच १२ वर्षांच्या बालिकेची छेडछाड केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.

काळिमा; सावत्र पित्याची अल्पवयीन बालिकेसोबत छेडछाड; विरोध करणाऱ्या सासूला मारहाण
नागपूर : पाचपावली परिसरात एका सावत्र वडिलानेच १२ वर्षांच्या बालिकेची छेडछाड केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. अशरफ युसुफ शेख (३८) असे आरोपीचे नाव आहे. बालिकेच्या आईचे दुसरे लग्न आरोपीशी झाले होते. आरोपीने ९ नोव्हेंबरच्या दुपारी बालिकेशी अश्लील चाळे केले होते.
याची माहिती बालिकेने आपल्या ७० वर्षांच्या आजीला दिली होती. आजीने आरोपीची समजूत घातली असता आरोपीने तिला मारहाण केली. वृद्ध आजीचा उजवा हात फ्रॅक्चर केला. फिर्यादी आजीच्या तक्रारीवरून पाचपावली ठाण्याचे उपनिरीक्षक जायभाये यांनी आरोपीविरुद्ध छेडखानी, मारहाण, पोक्सोसह इतर कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.