एकीकडे कडक, दुसरीकडे शिथिलता ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:09 AM2021-04-21T04:09:23+5:302021-04-21T04:09:23+5:30
नागपूर : काेराेनाची दुसरी लाट भयंकर रूप धारण करीत असतानाही मास्क वापरणे व शारीरिक अंतर पाळण्याबाबत नागरिकांमध्ये अद्याप गंभीरता ...
नागपूर : काेराेनाची दुसरी लाट भयंकर रूप धारण करीत असतानाही मास्क वापरणे व शारीरिक अंतर पाळण्याबाबत नागरिकांमध्ये अद्याप गंभीरता दिसून येत नाही. लाॅकडाऊन लावल्यानंतरही विशेषत: तरुण वस्त्यांच्या गल्ल्यांमध्ये नाहक फिरताना दिसत आहेत. रस्त्यावर येत नाही, पण आतमध्ये वाहन घेऊन फिरणे चालले असते. प्रशासनातर्फे केवळ रस्त्यावर लक्ष दिले जात आहे. पण, गल्यांमधील बेजबाबदारपणा कायम आहे.
टेस्ट सेंटरवरही बेजबाबदारपणाचा कळस
लाेकमत टीमने आरटी-पीसीआर केंद्रावर पाहणी केली असता, नागरिकांकडून बेजबाबदारपणाची परिसीमा गाठल्याचे दिसून येते. नागरिक टेस्ट करण्यासाठी गर्दी करीत असल्याचे दिसत असून, शारीरिक अंतर पालनाचा फज्जा उडाल्याचे चित्र आढळून आले. पाेलीस कर्मचारी उपस्थित असूनही या नागरिकांवर कारवाई केली जात नाही. राजनगर व मनपाच्या सदर येथील काेराेना टेस्ट सेंटरवर काही लाेक विनामास्क फिरताना दिसून आले. दाेन्ही सेंटरवर दरराेज ५०० पेक्षा अधिक नागरिक टेस्टसाठी येत असून, दरराेज हीच स्थिती दिसून येते.
बेजबाबदारपणा महागात पडेल
अशाप्रकारच्या बेजबाबदारपणामुळेच काेराेना संक्रमणात वेगाने वाढ हाेत आहे. शारीरिक अंतर पाळणे नितांत गरजेचे असतानाही लाेक गर्दी टाळताना दिसत नाही. हा बेजबाबदारपणा राेखण्यासाठी यंत्रणा कुचकामी ठरत असून, टेस्ट सेंटरवर हाेत असलेल्या अशा वागण्यामुळेच अधिकाधिक लाेक संक्रमित हाेत आहेत.