नागपुरात ओल्या सुक्या कचऱ्याच्या विलगीकरणाबाबत अद्यापी उदासीनता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2021 09:04 PM2021-12-21T21:04:47+5:302021-12-21T21:08:57+5:30
Nagpur News मनपा प्रशासनाने १५ डिसेंबरपासून ओला आणि सुका कचरा वेगवेगळा संकलित करण्याचे आदेश शहरातील कचरा संकलनाची जबाबदारी असलेल्या एजी एन्व्हायरो व बीव्हीजी कंपन्यांना दिले होते. मात्र मागील पाच दिवसांत यात फारशी सुधारणा झालेली नाही.
नागपूर : मनपा प्रशासनाने १५ डिसेंबरपासून ओला आणि सुका कचरा वेगवेगळा संकलित करण्याचे आदेश शहरातील कचरा संकलनाची जबाबदारी असलेल्या एजी एन्व्हायरो व बीव्हीजी कंपन्यांना दिले होते. मात्र मागील पाच दिवसांत यात फारशी सुधारणा झालेली नाही. अजूनही ५० टक्क्यांहून अधिक एकत्रित कचरा भांडेवाडी येथे साठविला जात आहे.
घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या आकडेवारीनुसार शहरात दररोज १२०० मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. भांडेवाडी डम्पिंग यार्ड येथे ७० टक्के मिश्रित कचरा साठविला जात आहे.
१५ डिसेंबरला शहरातून १२३७.६१ मेट्रिक टन कचरा उचलण्यात आला. यात ३८१.७३० मेट्रिक टन ओला आणि ५६.४३० मेट्रिक टन सुका कचरा होता. तर ७९९.४५० मेट्रिक टन मिश्रित कचरा उचलण्यात आला. म्हणजेच ५० टक्केही कचऱ्याचे विलगीकरण करण्यात आले नाही. १६ ते १८ डिसेंबर दरम्यान यात सुधारणा झालेली नाही.
१९ डिसेंबरला ११७६.३५ मेट्रिक टन कचरा उचलण्यात आला. यात ३६४.६२० मेट्रिक टन ओला कचरा व ७४.०९० मेट्रिक टन सुका कचरा होता. तर मिश्रित कचरा ७३७.६४० मेट्रिक टन होता.