मद्य तसेच हुक्क्याच्या धुरात झिंगाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:09 AM2021-01-03T04:09:28+5:302021-01-03T04:09:28+5:30

मद्य तसेच हुक्क्याच्या धुरात झिंगाट - तोकड्या कपड्यातील तरुणींसह ६७ जण पोलिसांच्या ताब्यात लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : रामदासपेठेतील ...

Stinging in the smoke of alcohol as well as hookah | मद्य तसेच हुक्क्याच्या धुरात झिंगाट

मद्य तसेच हुक्क्याच्या धुरात झिंगाट

Next

मद्य तसेच हुक्क्याच्या धुरात झिंगाट - तोकड्या कपड्यातील तरुणींसह ६७ जण पोलिसांच्या ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : रामदासपेठेतील तुली इम्पेरियल या तारांकित हॉटेलमध्ये पोलिसांनी छापा मारून मद्य तसेच हुक्क्याच्या धुरात झिंगाट झालेल्या ६७ जणांना ताब्यात घेतले. या कारवाईमुळे संबंधित वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून पोलिसांनी सर्वच प्रकारच्या हॉटेल, लाऊंज आणि पबमधील पार्ट्यांच्या आयोजनाला रात्री ११ वाजेपर्यंतच मुभा दिली होती. त्यानंतर अशा प्रकारचे कुठे आयोजन आढळल्यास कडक कारवाईचेही आदेश दिले होते. पोलिसांचे आदेश झुगारून तुली इम्पेरियलमध्ये मध्यरात्र उलटूनही थर्टी फर्स्टच्या पार्टीच्या नावाखाली धांगडधिंगा सुरू असल्याची माहिती मिळाल्याने गुन्हे शाखेचे उपायुक्त गजानन राजमाने यांनी पहाटे २.३० च्या सुमारास आपल्या सहकाऱ्यांसह तेथे छापा मारला. यावेळी तेथे हुक्क्याचा धूर उडवत झिंगाट झालेल्या ६७ तरुण-तरुणी पोलिसांना आढळल्या. बहुतांश धनिकबाळे होती. दरम्यान, पोलीस हॉटेलमध्ये धडकल्याचे पाहून संबंधितांमध्ये एकच खळबळ उडाली. त्यांनी आरडाओरड सुरू केली. धावपळ वाढल्याने पोलिसांनी सर्वांना शांत करीत ताब्यात घेतले. या सर्वांचे मेडिकल करण्याचा पोलिसांनी निर्णय घेतल्याने त्यातील अनेकांनी फोनोफ्रेण्ड सुरू केले. पोलिसांनीही कायदेशीर कारवाईचा पवित्रा घेत साऱ्यांनाच गप्प केले. पहाटेपर्यंत कारवाईची प्रक्रिया राबवून नंतर त्या ६७ जणांना सूचनापत्र देत सोडून देण्यात आले.

---

व्यवस्थापकाला अटक, मालकाचा शोध सुरू

या प्रकरणात पोलिसांनी हॉटेल मालक आणि व्यवस्थापकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. व्यवस्थापक संजय पेंडसेला अटक करण्यात आली. मालकाला शोधण्यासाठी पोलीस त्याच्या बंगल्यावर धडकले. मात्र, ते तेथे आढळले नाहीत. या कारवाईमुळे संबंधित वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

--.................................................................................................

तोकड्या कपड्यातील मुली

धांगडधिंगा

हुक्क्याचा धूर

बार बंद, रुफवर पार्टी ३०० पेक्षा जास्त लोक, रूम घेतल्या होत्या. २ लाखांची दारू सर्वच्या सर्व उंची विदेशी मद्य

६७ तरुण, २, मालक एक व्यवस्थापक संजय पेंडसेला अटक मोहब्बतसिंग तुली

पेंचला रिसार्ट

त्यांच्यासह हॉटेल मालक आणि व्यवस्थापकाविरुद्ध पोलिसांनी

Web Title: Stinging in the smoke of alcohol as well as hookah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.